Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शारदा पतसंस्थेला साडेचार कोटींचा विक्रमी नफा, पारदर्शकतेच्या जोरावर संस्थेच्या ठेवी दोनशे कोटींवर नेण्याचा संकल्प: गिरीश मालपाणी
शेती व सहकार

शारदा पतसंस्थेला साडेचार कोटींचा विक्रमी नफा, पारदर्शकतेच्या जोरावर संस्थेच्या ठेवी दोनशे कोटींवर नेण्याचा संकल्प: गिरीश मालपाणी

अध्यक्ष पडताणी, उपाध्यक्ष कानकाटे यांनी दिली संस्थेच्या प्रगतीची माहिती
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 4, 2023Updated:April 4, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर, प्रतिनिधी
शहराच्या व्यापार क्षेत्राला दिशा देणार्‍या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदार व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्‍वासाच्या जोरावर आगामी वर्षभरात संस्थेतील ठेवींचा आकडा दोनशे कोटींच्या पार नेण्याचा संकल्प आहे. विविध ग्राहकोपयोगी सुविधा, स्वच्छ व पारदर्शक व्यवहार आणि उच्च कोटीची कामकाज प्रणाली यामुळे आधुनिक संस्थांच्या पंक्तितही संस्थेने भरारी घेतली आहे. ठेवीदारांच्या याच विश्‍वासाच्या जोरावर संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात १६९ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडतांना विक्रमी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी दिली.

संस्थेच्या ३१ मार्च अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देतांना विद्यमान अध्यक्ष विशाल पडताणी म्हणाले, कोविड संक्रमणाच्या कालावधीनंतर जगभरात निर्माण झालेली आर्थिक मंदी, शेतीमालाचे घसरते भाव अशा स्थितीतही ठेवीदार व ग्राहकांनी संस्थेवर विश्‍वास ठेवल्याने ठेवी वाढल्या. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने २९७ कोटी ३७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला असून १२८ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले.

उपाध्यक्ष सोमनाथ कानकाटे म्हणाले, संक्रमण, आर्थिक मंदी अशा स्थितीतही संस्थेने आपल्या ग्राहकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचा सतत प्रयत्न केला. गरजू व व्यवहारी कर्जदार या संस्थेच्या संस्थापकांच्या धोरणाचा अवलंब केल्याने गेल्या आर्थिक वर्षात संस्थेची थकबाकी नगण्य ठेवण्यातही संचालक मंडळाने यश मिळवले. मार्च अखेर संस्थेतील ठेवींचा आकडा १६८ कोटी ८१ लाखांवर गेला असून आगामी आर्थिक वर्षात तो २०० कोटीच्या पार नेण्याचा संकल्प संचालक मंडळाने केल्याचे त्यांनी सांगितले.

सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांनी संचालक मंडळावर विश्‍वास दाखवल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी, अध्यक्ष विशाल पडताणी, उपाध्यक्ष सोमनाथ कानकाटे यांच्यासह संचालक मंडळातील डॉ. योगेश भुतडा, कैलास आसावा, सीए संकेत कलंत्री, सुमीत अट्टल, राजेश लाहोटी, रोहित मणियार, राजेश रा. मालपाणी, कैलास राठी, अमर झंवर, उमेश झंवर, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतिका बाहेती, जगदीश टोकसे, लक्ष्मीनारायण पलोड, राजकुमार पोफळे यांच्यासह व्यवस्थापक माधव भोर, सहाय्यक व्यवस्थापक विलास सांगळे व कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 349
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या…

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.