Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेचा शुभारंभ, संगमनेरमध्ये अपर्णा जोशी ठरल्या पहिल्या खात्याच्या मानकरी
प्रशासन

‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेचा शुभारंभ, संगमनेरमध्ये अपर्णा जोशी ठरल्या पहिल्या खात्याच्या मानकरी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/04/2023Updated:05/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
देशाच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा शुभारंभ देशभरातील १ लाख ५९ हजार पोस्ट ऑफिसेसमधून करण्यात आला. संगमनेरमध्ये गणेशनगर मधील रहिवासी अपर्णा जोशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रथम महिला मानकरी ठरल्या.

संगमनेरमधील मुख्य डाकघर येथे यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निश्चित व्याजदर व जास्त परतावा यामुळे ही योजना महिलांच्या आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी व्यक्त केला. निश्चित आर्थिक ध्येयपूर्ती करण्यासाठी महिलांनी या खात्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी पोस्टमास्तर महेश कोबरणे यांनी केले.
अपर्णा जोशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रथम महिला मानकरी ठरल्याने त्यांचे अभिनंदन करून त्यांना तात्काळ ‘महिला सन्मान बचत पत्र’ खाते पुस्तक सहाय्यक पोस्टमास्तर कविता क्षीरसागर व सुमंत काळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

यावेळी वैशाली कुलकर्णी, तेजस्विनी उपासनी, मनीषा ठुसे, नेहा उपासनी, रेश्मा वाकचौरे, तृप्ती काळे आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी शैलेश शिलवंत, प्रशांत जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रशांत बांगर, बाळासाहेब शिंदे, शांताराम बोऱ्हाडे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रदीप सोनकांबळे यांनी प्रास्ताविक तर नवनाथ कहांडळ यांनी आभार मानले.

‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेमुळे महिलांच्या आर्थिक नियोजनास मदत होईल. श्रीरामपूर विभागामधील सर्व पोस्ट ऑफिसेसमधून या योजनेचा लाभ घेता येईल. महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत आहे.
हेमंत खडकेकर, डाक अधीक्षक, श्रीरामपूर विभाग.

अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये-

☆ ७.५% निश्चित व्याजदर, चक्रवाढ पद्धतीने व्याज.
☆ सदर योजना महिला व मुलींकरिता उपलब्ध आहे.
☆ परिपक्वता कालावधी ०२ वर्षे
☆ गुंतवणूक- किमान रुपये १ हजार ते कमाल रुपये २ लाख.
☆ २ लाखापर्यंत कितीही बचतपत्रे घेता येतील. परंतु दोन खात्यांमध्ये किमान तीन महिन्याचे अंतर आवश्यक.
☆ एक वर्षानंतर ४०% रक्कम काढता येईल.
☆ अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 280
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.