Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हनुमान जयंती उत्सव; संस्कार बालभवनच्या मुलांनी साकारले अकरा मारुती!
शिक्षण

हनुमान जयंती उत्सव; संस्कार बालभवनच्या मुलांनी साकारले अकरा मारुती!

समर्थ रामदासांच्या रामभक्तीचे घडले दर्शन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/04/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
गीता परिवार संचालित संस्कार बालभवनमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या अकरा मारुतींच्या वेशभूषा करुन मुलांनी उपस्थितांना शिवकाळाचे दर्शन घडवले. बालभवनमध्ये जमलेल्या पालक व नागरीकांच्या उपस्थितीत हनुमानरुपी बालकांचे यावेळी पूजन करण्यात आले. मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणानंतर बजरंग बली की जयच्या घोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.

हनुमान जयंती निमित्ताने गीता परिवाराच्या संस्कार बालभवनमधील सर्व मुलांना महाबली हनुमानाच्या तर मुलींना अंजनी मातेच्या वेशभूषेत बोलावण्यात आले होते. यावर्षी शिवकाळात समर्थ रामदास स्वामींनी राज्याच्या कानाकोपर्‍यात स्थापन केलेल्या विविध अकरा मारुतींच्या वेशभूषा बालकांनी साकारल्या होत्या.

यात चाफळ येथील विरप्रताप मारुती, शिंगणवाडी येथील खडीचा मारुती, माजगावचा मारुती, उंब्रज येथील मठातील मारुती, चाफळ येथील दास मारुती, शहापूर येथील चुन्याचा मारुती, बत्तीस शिराळा येथील शिराळ्याचा मारुती, मनपाडळे मारुती, मसूर येथील महारुद्र हनुमान, पारगाव येथील बाल मारुती, बहे-बोरगावचा मारुती या ठिकाणच्या मारुतीच्या वेशभूषा मुलांनी हुबेहूब साकारल्या.

या कार्यक्रमासाठी मुलांचे पालक, नागरीक उपस्थित होते. बालगोपाल व त्यांच्या पालकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संस्कार बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी, राष्ट्रीय सहसचिव गिरिश डागा यांच्या मार्गदर्शनाखाली बालभवनच्या प्रशिक्षिका रुपाली रायकर, ज्योती भालेराव, स्वराली संत, ईश्वरी सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 228
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक…

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.