Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या नगरपालिका शाळांचा कायापालट होणार; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे ॲक्शन मोडमध्ये!
शिक्षण

संगमनेरच्या नगरपालिका शाळांचा कायापालट होणार; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे ॲक्शन मोडमध्ये!

बदलत्या काळानुसार या शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. हीच गरज ओळखून डॉ. मैथिली तांबे यांनी शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक समितीच्या सभापती डॉ. अनुराधा सातपुते, शिक्षणाधिकारी जाहिद शेख यांच्यासोबत शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी – 
फिनलंडमधील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर, आता संगमनेर शहरातील नगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी पुढाकार घेतला आहे. समाजातील गरजू आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या नगरपालिका शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शाळांच्या कामकाजाची पाहणी सुरू केली आहे. यामुळे लवकरच नगरपालिकेच्या शाळांचे रूप पालटणार असल्याचे संकेत मिळत असून शैक्षणिक क्षेत्रात या दौऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे.
नगरपालिका शाळांमधून उद्याचे सक्षम नागरिक घडत असतात, मात्र बदलत्या काळानुसार या शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. हीच गरज ओळखून डॉ. मैथिली तांबे यांनी शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक समितीच्या सभापती डॉ. अनुराधा सातपुते, शिक्षणाधिकारी जाहिद शेख यांच्यासोबत शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या.
यामध्ये प्रामुख्याने जनता नगरमधील राजमाता जिजाऊ शाळा क्रमांक ९, अशोक चौकातील स्व. इंदिरा गांधी शाळा क्रमांक १, स्वातंत्र्य चौकातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक २, चव्हाणपुरा भागातील स्व. कल्पना चावला शाळा क्रमांक ६ आणि घासबाजार येथील अहिल्यादेवी कन्या शाळा क्रमांक ४ यांचा समावेश होता.
या दौऱ्यादरम्यान डॉ. तांबे, डॉ. सातपुते यांनी केवळ औपचारिक भेट न देता प्रत्येक शाळेतील वर्गखोल्यांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहांची अवस्था आणि उपलब्ध शैक्षणिक साहित्याची बारकाईने पाहणी केली. त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, शिक्षकांशी चर्चा करून त्यांना शिकवताना येणाऱ्या अडचणी आणि शाळांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबी समजून घेतल्या. केवळ कागदावर अहवाल न मागवता प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.
फिनलंडमधील शिक्षण पद्धतीवर भाष्य केल्यानंतर डॉ. तांबे आता स्थानिक स्तरावर त्याच दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आग्रही असल्याचे या पाहणीतून दिसून आले. ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या, त्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या असून तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. शैक्षणिक वातावरणासोबतच शाळांची स्वच्छता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर त्यांचा विशेष भर असणार आहे.
नगरपालिका शाळांच्या सक्षमीकरणामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या या पुढाकारामुळे संगमनेरमधील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणार असून, या शाळा खऱ्या अर्थाने गुणवत्तेचे केंद्र बनतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 731
अनुराधा सातपुते मैथिली तांबे शाळा पाहणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांची सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात पूजा करून मानाच्या ‘इच्छापूर्ती गणेशा’च्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचा सपत्नीक सहभाग

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.