Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्र्याची अयोध्येमध्ये भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा
राजकारण

विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्र्याची अयोध्येमध्ये भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा

देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही, अयोध्या दौऱ्याला नावं ठेवू नका. नाही तर प्रभु श्रीराम धडा शिकवतील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येमध्ये भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे, प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय वेगळे नसल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

नांव न घेता राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. ते म्हणाले, देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. आपलं सरकार नसतं तर साधूंच्या जीवाला धोका असता. अयोध्या दौऱ्याला नावं ठेवू नका. नाही तर प्रभु श्रीराम धडा शिकवतील. असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर वेगळीच वलय जाणवली. राम मंदिराचा स्वप्न बाळासाहेबांनी पहिल्यांदा बघितलं होतं. राम मंदिर हिंदुत्वाच प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. मंदिराचे काम इतक्या वेगाने होते आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. अयोध्येत आलो हा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. अयोध्येमध्ये माझं मोठं स्वागत झाले.

राम मंदिर हा राजकारणाचा विषय अजिबात नाही. मात्र माझ्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होत आहे. ते जाणून-बुजून माझ्यावर टीका करत आहेत. काही लोकांना हिंदुत्वाची ॲलर्जी आहे. हिंदूधर्म सर्व धर्मांचा आदर शिकवितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला आहे. अशा स्थितीत काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवित आहेत.

महाराष्ट्रात जनतेने भाजप-शिवसेनेला मत दिली. मात्र काही लोकांनी स्वार्थापोटी हा कौल नाकारला. आणि सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, स्वप्नांना तिलांजली दिली. आज भाजप-शिवसेना सत्तेत आली, याचा जनतेला आनंद आहे. मी ऑफिस अथवा घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. जमिनीचे नातं असणारा मुख्यमंत्री आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 184
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.