Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महेश पतसंस्थेला २ कोटी ११ लाखांचा नफा! पारदर्शी कारभारातून वर्षभरात ठेवींमध्ये लक्षणीय वाढ: सीए कैलास सोमाणी
शेती व सहकार

महेश पतसंस्थेला २ कोटी ११ लाखांचा नफा! पारदर्शी कारभारातून वर्षभरात ठेवींमध्ये लक्षणीय वाढ: सीए कैलास सोमाणी

ठेवींचा आकडा १०० कोटींच्या पार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणार्‍या महेश नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कोविड संक्रमणात अडचणीत आलेल्या व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याबरोबरच संस्थेने आजपर्यंत सुमारे ७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले असून ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या वर्षभरात संस्थेने अतिशय पथदर्शी कारभार केल्याने संस्थेच्या ठेवींमध्येही जवळपास ३६ टक्क्यांनी वाढ झाली असून ठेवींचा आकडा १०० कोटींच्या पार गेल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सीए कैलास सोमाणी व व्हा. चेअरमन योगेश रहातेकर यांनी दिली.

संगमनेरातील पतसंस्था क्षेत्रात नावाजलेल्या महेश नागरी पतसंस्थेने स्थापनेपासूनच शहरातील व्यापार-उदीमाची भरभराट व्हावी, छोट्या व्यापार्‍यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करुन देण्याची परंपरा जोपासली आहे. त्याशिवाय संस्थेच्यावतीने ज्येष्ठ सभासदांसाठी पेन्शन ठेव योजना, सभासदांसाठी वैद्यकीय साहाय्य, सातत्याने १५ टक्के लाभांशाचे वाटप, योग्य आणि प्रामाणिक कर्जदारांच्या बळावर थकबाकीवर नियंत्रण या संस्थेच्या जमेच्या बाजू आहेत. यावर्षी संस्थेने २.६५% इतकी नाममात्र थकबाकी राखली आहे. तसेच एनपीएसाठी आवश्यक असलेल्या एकूण तरतूदीपेक्षा दुप्पट तरतूद केली आहे हे विशेष.

स्वर्गीय मोहनलालजी मणियार यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहीलेल्या आणि डॉ. शशिकांत पोफळे, अनिल अट्टल, श्रीकांत (लाला) मणियार यांच्यासारख्या ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात संस्थेच्या ठेवींमध्ये ३७% टक्के वाढ झाली असून एकूण ठेवी १०० कोटी ८० लाखांच्यावर गेल्या. संस्थेने ७४ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून १७५ कोटी ६० लाखांचा विक्रमी एकत्रित व्यवसाय केला आहे. मार्चअखेर संस्थेचा एकूण निधी १३ कोटी २४ लाखांवर गेला असून सर्व खर्च, घसारा, एनपीए व अन्य तरतूदी वजा करुन संस्थेने निव्वळ २ कोटी ११ लाखांचा नफा मिळवला.

सभासद, ठेवीदार व ग्राहकांचा विश्‍वास कायम ठेवून पुढील आर्थिक वर्षातही संस्थेची घोडदौड अशीच कायम राहील, असा विश्‍वास संस्थेचे व्हा. चेअरमन योगेश रहातेकर, संचालक अनिल आट्टल, डॉ. शशिकांत पोफळे, आनंद तापडे, योगेश जाजू, श्रीकांत मणियार, ज्योती कासट, अनिल कलंत्री, नानासाहेब शेरमाळे, संतोष चांडक, सरला आसावा, नीलेश बाहेती, दिनेश सोमाणी, विशाल नावंदर, मोरेश्‍वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी, राजेश लड्डा, जयप्रकाश भुतडा व व्यवस्थापक दिगंबर आडकी यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 238
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.