Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कळत-नकळत घडलेल्या सायबर चुकांचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो: संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार
शिक्षण

कळत-नकळत घडलेल्या सायबर चुकांचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो: संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार

शिबिर • संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार यांचे सायबर क्राइमवर मार्गदर्शन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
कोविड कालावधीनंतर वर्क फ्रॉम होम आणि विद्याथ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती व त्यातून कळत-नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो, असे प्रतिपादन संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार यांनी केले.

दत्त विद्यालय, जवळे कडलग येथे ‘सायबर क्राइम’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, व्यासपीठावर मुख्याध्यापक सूर्यकांत सुर्वे , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य भास्करराव शेळके उपस्थित होते.

खैरनार म्हणाल्या, आपले चुकून पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी दिल्यास किंवा तसे केल्यास त्याविरुद्ध आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. त्यासाठी ३ ते ७ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होते. फेक अकाउंटचा वापर करून महिला आणि मुलींची बदनामी केली जाते. स्पाय अॅपपासून सावधानता बाळगा. स्पाय अॅपमुळे कोणीही कोणाच्याही मोबाइलचा पूर्ण ताबा घेऊ शकतो, तसेच त्या मोबाइलला वरील सर्व माहिती बघू शकतो. अगदी आलेले गेलेले कॉल्स, मेसेज, व्हॉट्सअॅपचे मेसेज, फोटो, व्हिडिओ, लाइव्ह रेकॉर्डिंग आदी स्पाय अॅप मोबाइलमध्ये टाकण्यासाठी काही सेकंद पुरेसे असतात.

त्यामुळे आपला मोबाइल थोडा वेळही कोणाच्या ताब्यात देऊ नये. कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास, बँक खाते किंवा सोशल मीडिया हॅक झाल्याची शंका असल्यास, तसेच कोणीही ऑनलाइन धमकी दिल्यास त्वरित सायबर पोलिसांत तक्रार करणे गरजेचे असते. जेवढे लवकर आपण पुढे येऊ, तेवढे लवकर सायबर गुन्ह्यांना आळा बसू शकेल. याशिवाय स्पाय अॅपबद्दल अधिक माहिती, त्याचा दुरुपयोग, त्यातून होणारे गुन्हे आणि कायदा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

वृषाली कडलग म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सायबर साक्षर झाल्यास भविष्यातील अनर्थ टळू शकतील. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. समाज माध्यमांचा संयत वापर करायला हवा. सोशल मीडिया वापरू नये किंवा तो वाईटच आहे, असे नाही; पण तो आपण नक्की कशासाठी आणि किती वेळ वापरायचा, हे कळायला हवे. सततचे स्क्रोलिंग, विद्वेष, झुंडशाही, गॉसिप आणि नकारात्मकतेपासून दूर राहायला जमले तर इथून खूप काही शिकता येते.

सिद्धी वाकचौरे, प्रदिप कडलग, समिक्षा देशमुख, संस्कृती लावरे, साहिल ढगे यांनी विचारलेला प्रश्नांना वैशाली खैरनार यांनी उत्तरे दिली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक सूर्यकांत सुर्वे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अनिल वाकचौरे यांनी तर आभार प्रदर्शन हौशीराम सोनवणे यांनी केले. याप्रसंगी दशरथ मांडे, संजय कानवडे, स्नेहलता कडलग आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 371
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या विरोधात अहिल्यानगर स्थानिक…

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.