Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील यापूर्वीच्या अवकाळीच्या नुकसानीपोटी ६ कोटी रुपयांची मदत; नव्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देणार: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
राजकारण

संगमनेर तालुक्यातील यापूर्वीच्या अवकाळीच्या नुकसानीपोटी ६ कोटी रुपयांची मदत; नव्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देणार: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
महसूलमंत्र्यांनी यावेळी नुकसानीने बाधित झालेल्या संवाद साधला
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर
यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महसूलमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या गावात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.अतिवृष्टीने प्रत्येक पीकाचे किती क्षेत्र बाधीत झाले याची आकडेवारी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाकडून जाणून घेतली. तसेच पंचानाम्याचा आढावाही घेतला. मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष डाळींब कांदा टोमॅटो या पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.

भाड्याने देणे आहे

या नूकसानीच्या ठिकाणी जावून मंत्री विखे पाटील यांनी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देवून या संकटात शासन तुमच्या सोबत असल्याची ग्वाही‌ दिली. राज्य सरकारने आजपर्यत झालेल्या सर्वच नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.

यासाठी एनडीआरफचे नियम आणि निकष सुध्दा बदलले. शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्यासाठी असलेली मर्यादासुध्दा वाढवली असल्याचे सांगून आता मदतीसाठी सततचा पाऊससुध्दा ग्राह्य धरण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. आजच्या दौऱ्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा अनुदानाच्या बाबतीत नव्याने काही सूचना दिल्या असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

नगर जिल्ह्याकरीता नैसर्गिक आपतीची आतापर्यत २७० कोटी रुपयांची मदत उपलब्ध झाली असून, उर्वरीत मदत येत्या काही दिवसात मिळणार आहे. संगमनेर तालुक्याकरीता झालेल्या नूकसानीपोटी ६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. नव्याने बाधीत झालेल्या पीकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासन मदतीचा निर्णय करेल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची खात्री शेतकऱ्यांना आम्ही बांधावर जावून देत असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 378
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.