मुंबई – महाराष्ट्र संवाद न्यूज
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळ आल्यानंतर हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर राजकीय वातावरण तापलेल असतानाच फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक जण संपर्कात आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक जण आमच्याकडे भाजपात आले. संपर्काच्या नात्यांमध्ये परिवर्तन निवडणुकीवेळी होत असतं. आमच्या संपर्कात अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक आमदार आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नाही. काही मतदारसंघ असे आहेत जिथे, आम्ही अजून पोहोचलेलो नाही. या माध्यमातून तेथे पोहोचायला मिळाले तर चांगलंच आहे, असेही ते म्हणाले.

राजकीय संबंध वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे. येथे आम्हाला रोज एकमेकांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्रातील परिस्थिती दक्षिणेतील राज्यांसारखी नाही. आम्ही धर्मांध शत्रुत्व बाळगत नाही, एकमेकांच्या विरोधात कितीही बोललो तरी आपलं नातं चांगलं होऊ शकतं. संपर्काचे रूपांतर नात्यात करण्याची वेळ आली आहे. ही वेळ निवडणुकीपूर्वीच येईल. असे म्हणत बाकी अर्धसत्य सांगायची वेळ येईल ती वेळ आल्यावर नक्की सांगेन.
भाजपाला अजूनही इतर पक्षातील आमदार पक्षात आणण्याची गरज वाटते का? असे विचारले असता ते म्हणाले, गरज कधीही संपत नाही. आम्ही सक्षम आहोत. परंतु शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू.

