Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खंडकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न महिन्याच्या आत सोडविणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राजकारण

खंडकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न महिन्याच्या आत सोडविणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जिल्ह्यात १ मे पासून डेपोतून ६०० रूपये ब्रास वाळू मिळणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, महाराष्ट्र संवाद न्यूज
सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील ७ कोटी ७८ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राहाता पंचायत समितीचे उप अभियंता देविदास धापटकर, सावळीविहिरचे सरपंच ओमेश साहेबराव जपे‌, बाळासाहेब जपे आदी उपस्थित होते.

भाड्याने देणे आहे

विखे म्हणाले, महापुरुषांच्या जयंती साजरी करतांना त्यांच्या आचार-विचारांवर कार्यकर्त्यांनी काम करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आपला देश जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे भव्य स्मारक उभे राहत आहे‌. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे‌. बेरोजगारी कमी होत आहे. कोवीड काळात सतत दोन वर्ष देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटप करण्यात आले. मोफत लसीकरण करण्यात आले.

नवीन होणारा ग्रीन फिल्ड कॅरिडार, मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग पहिला टप्पा सुरू झाला आहे‌. मुंबई ते शिर्डी दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लॅडिंग सुरू झाले आहे. शिर्डी विमानतळाचा विस्तार करत नवीन टर्मिनल इमारत होणार आहे. सावळीविहिरमध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे‌. सोनवाडी येथे पाचशे एकर जागेत लॉजिस्टिक्स पॉर्क, आयटी पार्क होणार आहे. यामुळे या परिसरातून देशभरात मालाची ने-आण करणे शक्य होणार आहे.

यातून येत्याकाळात येथील परिसरातील तरूणांना रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येथील तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता एकत्र येत स्वत:चा व्यवसाय सुरू करावा. जिल्ह्यात १ मे पासून डेपोतून ६०० रूपये ब्रास वाळू मिळणार आहे‌‌. अशा प्रकारे ६०० रूपयांत वाळू वाटप करणारा अहमदनगर राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे. जून अखेर जमिन मोजणीचे साडेतीन हजार प्रकरणे निकाली काढून आपणास घरपोच नकाशे देणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सूशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन ही यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनींना सायकल, तसे अस्थिव्यंग विद्यार्थ्यांनीना व्हीलचेअर वाटप करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 385
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.