Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम; अक्षय तृतीयेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी होणार विवाहबद्ध
सामाजिक

मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम; अक्षय तृतीयेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी होणार विवाहबद्ध

विवाह सोहळ्याचे रौप्य महोत्सवी वर्ष
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 17, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमध्ये येत्या शनिवारी २२ एप्रिलला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २५ वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेत यंदा संगमनेर तालुक्यातील २५ जोडपी विवाहबद्ध होतील. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास दहा हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली.

मालपाणी उद्योग समुहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांनी १९९७ साली या उपक्रमाची सुरुवात केली. लोकहिताचा हा उपक्रम जनतेच्या उस्त्फुर्त प्रतिसादाने रौप्यमहोत्सवी ठरला आहे. गेल्या अडीच दशकांत या सोहळ्याच्या माध्यमातून बाराशेहून अधिक परिवार एकमेकांशी जोडले गेले. अवघ्या १ रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणारा हा सोहळा राज्यात कौतुकाचा विषय ठरत असतो. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध अशा सर्वधर्मीय वधू-वरांचे विवाह त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार लावण्यात येतात.

भाड्याने देणे आहे

या सोहळ्यासाठी विविध २५ कार्य समित्या काम करीत असून विवाहस्थळी सुसज्ज शाही मांडव, वधू-वरांची स्वतंत्र निवास व्यवस्था, दोन्ही बाजूच्या पाहुण्यांसह निमंत्रितांच्या भोजनाची व्यवस्था, शाही सवाद्य वर मिरवणूक, विवाहबद्ध होणार्‍या नवदाम्पत्यांना पोषाख, मुंडावळ्या, अक्षता, पुरोहित वृन्दाकडून मंत्रोच्चारात होणारी सप्तपदी व मंगलाष्टके तर बौध्द, मुस्लीम, ख्रिश्चन धर्मियांच्या परंपरेनुसार त्या-त्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत हे विवाह साजरे होणार आहेत.

प्रत्येक दाम्पत्याला मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने स्टील कपाट, भांडी, भांड्यांची मांडणी व संसारपयोगी साहित्य असे सुमारे पंचवीस हजारांचे साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. शनिवारी २२ एप्रिलला सायंकाळी चार वाजता मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड येथे पार पडणार्‍या या सोहळ्यासाठी सकाळी १० वाजता वर्‍हाडी मंडळींचे लग्नस्थळी आगमन होईल.

संगमनेरकरांनी या शाही सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन मालपाणी उद्योग समुहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह डॉ. संजय, मनीष, गिरीश, आशीष मालपाणी यांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 325
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026

असंघटित कामगार: श्रेय लाटणाऱ्यांवर संजय कोल्हे यांची घणाघाती टीका; सत्तेचा दुरुपयोग करून फोटो चिटकवण्याचे राजकारण दुर्दैवी

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी…

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.