Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नीतीमूल्यांचे शिक्षण देत विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर: रमेश पावसे
शिक्षण

नीतीमूल्यांचे शिक्षण देत विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर: रमेश पावसे

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 21, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
पालक हे मुलांचे प्रथम शिक्षक तर शिक्षक मुलांचे दुसरे पालक असतात. नीती मूल्यांची नैतिक शिकवण देत परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, असे प्रतिपादन देवगड विद्यालयाचे मावळते मुख्याध्यापक रमेश पावसे यांनी केले.

33 वर्षाच्या शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक पावसे सेवानिवृत्त झाले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयामध्ये आयोजित सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कढणे होते. पुण्याच्या जलजीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यावेळी उपस्थित होते. पावसे यांनी केलेल्या शैक्षणिक सेवेची दखल घेत संस्थेतर्फे त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह देण्यात आले.

भाड्याने देणे आहे

राजेंद्र रहाणे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता त्यांच्यात मूल्यांची, चांगल्या विचारांची रुजवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी विविध अंगी चौफेर वाचन करणे आवश्यक आहे. बदलते तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले पाहिजे तरच ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवू शकतील.

यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी पुण्याचे उपमृदा सर्वेक्षण अधिकारी रणजीत सिंग माचरेकर, इंडसिस सॉफ्ट इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित वाळे, संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कढणे, एम. एम. फटांगरे, डॉ. रमेश पावसे, डॉ. प्रमोद पावसे, ॲड भगवान उऱ्हे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच यावेळी आजी-माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक रमेश पावसे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू, सेवाकाळातील विविध प्रसंग यांचे विवेचन, त्यांच्या सहवासातील विविध क्षण, जीवनपटातील विविध आठवणींना भावुक होऊन उजाळा दिला. यावेळी हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, एस. एम. राहणे, दिनेश थोरात यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीमती हांडे, सन्मानपत्राचे वाचन मदन माने यांनी केले. सूत्रसंचालन सर्जेराव वाघ, श्रीमती भालेराव यांनी केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 292
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

शिक्षकांच्या समर्पित योगदानामुळे शिंदेवाडी शाळा समृद्ध : विस्तार अधिकारी अनिल गायकवाड

June 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी…

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.