Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्हाळुंगी पूलप्रश्नी आता संगमनेरकरांची वज्रमुठ; प्रशासन अजूनही अंत बघणार का! पुलाची दुरुस्ती कधी करणार
आंदोलन

म्हाळुंगी पूलप्रश्नी आता संगमनेरकरांची वज्रमुठ; प्रशासन अजूनही अंत बघणार का! पुलाची दुरुस्ती कधी करणार

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता करणार आंदोलन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2023Updated:22/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
तब्बल सात महिने उलटून गेल्यानंतर देखील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणाऱ्या म्हाळुंगी नदीतील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासन अद्यापही करू शकले नाही. पालिकेत सुरू असलेला प्रशासकीय कारभार आणि राजकीय श्रेय वादाच्या टोलवाटोलवीमध्ये या फुलाचा प्रश्न अडकला असल्याने आता या प्रश्नी स्थानिक नागरिक आणि संगमनेरकरांनी आपली वज्रमुठ आवळली असून आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी (२४ एप्रिल) म्हाळुंगी नदीवरील पडलेल्या पुलाच्या दुरुस्ती करता आंदोलन करण्यात येणार असून तशा आशयाचे निवेदन तब्बल दीडशे लोकांनी प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

या प्रश्नी संगमनेरकरांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या असल्याचे दिसते. या पुलावरून दररोज हजारो व्यक्तींची ये-जा सुरू असते. परिसरात असलेली विविध मंदिरे त्यामुळे देवदर्शनासाठी येणारे नागरिक, प्रवरा नदीकाठ-गंगामाई घाट या परिसरात पहाटे, सकाळी, संध्याकाळी फिरण्यासाठी येणारे शेकडो आबाल वृद्ध, केशवतीर्थ घाटावर दशक्रिया विधीसाठी येणारे शेकडो लोक, शाळा आणि महाविद्यालयात येणारे तीन हजारावर विद्यार्थी, साईनगर पंपिंग स्टेशन कासारवाडी परिसरातील शेकडो रहिवाशी आदींचा या पुलावरून नियमित वावर असतो.

सध्या संगमनेर नगर परिषदेत प्रशासकीय राज सुरू असून पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात कोणतेही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. नगरपरिषदेत कौन्सिल नसल्याने कोणत्याही कामासाठी मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांना सर्वाधिकार आहेत. मात्र तरीदेखील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता वाटत नसून पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये केवळ पत्र व्यवहाराची टोलवाटोलवी सुरू आहे. अशा परिस्थितीत पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच प्रमुख राजकीय नेत्यांना अपयश आल्याचे दिसते.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दोघा माजी नगरसेवकांसह सह्या करणाऱ्या नागरिकांनी म्हटले आहे की, म्हाळुंगी पूल कोसळून भरपूर दिवस झाले आहे. नागरिकांनी मुख्याधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रार करूनही अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही. या पुलासंदर्भात विद्यार्थी, पालक, भाविक व नागरिकांशी कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी महिला भाविकांचा आपल्याबद्दल रोष वाढत चालला आहे. भविष्यात नागरिकांकडून कुठल्याही उद्रेक होऊ शकतो. तरी आपण या संदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलून यातून मार्ग काढावा, असे वारंवार सुचवले आहे.

आमचे येणे- जाणे बंद झाल्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास मनस्ताप होत आहे. यात खास करून विद्यार्थी व वृद्ध व्यक्ती यांचा समावेश असल्याने आपणांस कळकळीची विनंती आहे की, आपण पडलेल्या पुलाची नवीन बांधकाम इस्टिमेट निविदा मंजूर होईपर्यंत त्या ठिकाणी मुरूम किंवा रिबेट टाकून तात्पुरता येण्या-जाण्याचा रस्ता, नागरिकांसाठी पायी जाण्याचा मार्ग करून द्यावा. त्यावरून जड वाहतूक होणार नाही अशी व्यवस्था करावी. आपणाकडून असे होणार नसल्यास आम्ही आंदोलनात्मक पवित्र घेतल्यास प्रशासन याला जबाबदार राहील. या पत्राचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 324
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.