Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महेंद्र गायकवाड ठरला अहमदनगरच्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील सोन्याच्या गदेचा मानकरी!
क्रिडा व कला

महेंद्र गायकवाड ठरला अहमदनगरच्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील सोन्याच्या गदेचा मानकरी!

स्पर्धेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील 35 लाख रुपये किमतीचा अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या गदेचा मानकरी महेंद्र गायकवाड ठरला आहे.

अहमदनगरचा वाडिया पार्कमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात गायकवाड विजेता तर राक्षे उपविजेता ठरला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून हजारावर स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदीसह कुस्ती पंच, विविध क्षेत्रातील व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुस्ती हा आपला प्राचीन खेळ असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम या खेळाला राजाश्रय दिला. त्या पाठोपाठ छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला पाठबळ दिले. बंद पडलेल्या तालीम शाहू महाराजांनी पुनर्जीवीत केल्या. त्यांनीच कुस्तीतील विजेत्यांना चांदीचे गदा देण्याची परंपरा सुरू केली होती. आज पुन्हा या स्पर्धेच्या रूपाने विजेता स्पर्धकांना सोन्याची गदा देण्याची परंपरा सुरू झाली ही आनंदाची बाब आहे.

भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक पैलवान खाशाबा जाधव यांनी पटकाविले. त्यानंतर अद्याप हे पदक मिळू शकले नसल्याची खंत व्यक्त करत पुढील ऑलिंपिक विजेता हा महाराष्ट्राच्या मातीतूनच झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पैलवानाचे मानधन ३ हजारांहून १८ हजार रुपयांपर्यंत वाढविले. तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजय चौधरी यांना थेट पोलीस उपअधीक्षक पदाची नोकरी देण्यात आली‌‌. असे देखील फडणवीस म्हणाले.

मंत्री विखे पाटील यांच्यासह स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार प्रा. राम शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 925
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

29/03/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.