Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » म्हाळुंगी नदीवरील पुलासंदर्भात आमदार थोरात यांचे मोठे विधान; पालिका निवडणुकीपर्यंत पूल होऊ नये यासाठी भाजपच्या नेत्यांचे मंत्रालयात प्रयत्न
राजकारण

म्हाळुंगी नदीवरील पुलासंदर्भात आमदार थोरात यांचे मोठे विधान; पालिका निवडणुकीपर्यंत पूल होऊ नये यासाठी भाजपच्या नेत्यांचे मंत्रालयात प्रयत्न

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर साधले शरसंधान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/04/2023Updated:25/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर • महाराष्ट्र संवाद न्यूज
नगरपालिका निवडणुका होईपर्यंत म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम होऊ नये, यासाठी भाजपचेच काही नेते मुंबईत मुख्यमंत्री अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसापासून बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलासंदर्भात महत्त्वाचे विधान करताना भारतीय जनता पक्षातील वजनदार नेत्यावर शरसंधान साधले आहे.

थोरात म्हणाले, स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल दुर्दैवाने पडला आहे. पाण्याचा लोंडा मोठा असल्याने पूल पडल्याने अनेक नागरिकांची अडचण झाली आहे, ही बाब नाकारता येणार नाही. पुलाचे काम तातडीने व्हावे, यासाठी माझ्या पातळीवर प्रयत्न केले. मात्र राज्यात सरकार माझे नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीदेखील मी यासाठी आग्रही राहिलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र दिले आणि निधी मिळविण्याचा प्रयत्न केला.

मात्र काही मंडळी मुंबईत जाऊन नगरपालिका निवडणुका होईपर्यंत हा पूल होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे. या विषयावर आम्हाला आंदोलन करायचं आहे, अशी मांडणी ते मंत्रालयात करत आहेत. खरंतर सरकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांना या पुलाचे काम करून घेण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र पालिका निवडणुकीचे भांडवल म्हणून या पुलाचा प्रश्न पुढे आणला जात आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण हा इशू करू शकतो, असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितले जात आहे.

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आपण या संदर्भात सूचना दिल्या आहेत. केवळ मलाच नको तर भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं मुंबईत वजन आहे. त्यांना सुद्धा या कामाचे एस्टिमेट द्या. त्यांच्याकडून काम होईल, अशी अपेक्षा बाळगू शेवटी नागरिकाचे काम होण्यास महत्त्व आहे. त्याचे श्रेय आपण त्यांना देऊ, असे देखील थोरात म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,000
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.