Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रत्युत्तर… आमदार थोरात यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाले… स्वत:चे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न
राजकारण

प्रत्युत्तर… आमदार थोरात यांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाले… स्वत:चे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न

मंत्री विखे पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
स्‍वत:च्‍या नावाने व्‍यापारी संकुल उभारण्‍याचा घाट घालण्‍यापेक्षा म्‍हाळुंगी नदीच्‍या पुलाकरीता निधी आणण्‍याचे प्रयत्‍न केले असते तर, आपले अपयश उघडे झाले नसते. परंतू आता आपल्‍याला निधीही आणता येत नाही हे सर्व जनतेला कळाल्‍यानेच आपल्‍या अपयशाचे खापर दुस-यांवर फोडण्‍याचा आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्‍न म्‍हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असाच असल्‍याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिका-यांनी केला आहे.

म्‍हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्‍या नेतृत्‍वावर आ. थोरात यांनी केलेल्‍या आरोपांना भाजपाचे शहर अध्‍यक्ष श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्‍यक्ष जावेद जहागिरदार, अमोल खताळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

म्‍हाळुंगी नदीवरील पुल कुणामुळे खचला याची संपूर्ण कल्‍पना संगमनेरच्‍या जनतेला आहे. परंतू सत्‍ता नसल्‍याने वैफल्‍यग्रस्‍त झालेल्‍या थोरातांना पुलाच्‍या कामासाठी लोकप्रतिनिधी म्‍हणून निधी मंजुर करुन आणण्‍यात अपयश येत आहे. त्‍यामुळेच आपल्‍या अपयशाचे खापर दुस-यावर फोडण्‍याचा केविलवाणा प्रयत्‍न सुरु आहे.

वास्‍तविक राज्‍य सरकारने पुलाच्‍या कामासाठी सर्वतोपरी निधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी सकारात्‍मक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या माध्‍यमातूनही या पुलाच्‍या कामाचे सर्व प्रस्‍ताव नगरविकास विभागाकडे देण्‍यात आलेले आहेत. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पुलाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष बाब म्हणून ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी यापुर्वीच पत्र दिले असल्याची वस्‍तुस्थिती असतानासुध्‍दा कोणत्‍याही विषयाची माहीती करुन न घेता केवळ भारतीय जनता पक्षावर बेछुट आरोप करुन, थोरात वेळ मारुन नेण्‍याचे काम करीत आहेत. पुलाच्या कामासाठी जनता रस्त्यावर उतल्यानंतर थोरातांनी पुलाच्या कामावरून बोलायला सुरूवात करावी हे सुध्दा आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.

पुलाच्‍या कामाला महत्‍व न देता स्‍वत:च्‍या नातेवाईकांच्‍या नावाने व्‍यापारी सं‍कुल उभारण्‍याच्‍या कामाला प्राधान्‍य देणा-या थोरातांनी या व्‍यापारी संकुलाच्‍या कामाचा सर्व निधी पुलाच्‍या कामासाठी वर्ग करावा. असे थेट आव्‍हान भारतीय जनता पक्षाच्‍यावतीने देतानाच आपल्या बगलबच्चे असलेल्या ठेकेदारांच्या चूकीमुळे खचला असून यावर सुध्दा थोरातांनी बोलावे अशी मागणी करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 610
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.