Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पशुधन आणि दुधाच्या तालुक्यात जनावरांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीची आवश्यकता: रणजीतसिंह देशमुख
शेती व सहकार

पशुधन आणि दुधाच्या तालुक्यात जनावरांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीची आवश्यकता: रणजीतसिंह देशमुख

राजहंस दूधमध्ये पशुधन आरोग्याबाबत कार्यशाळा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 26, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
दररोज सात लाख लिटरपेक्षा अधिक दूध निर्माण होणारा संगमनेर तालुका दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जाणीव जागृती होण्यासाठी स्थानिक दूध संघाचे सचिव, पर्यवेक्षक यांनी अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले.

संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि आनंद यांच्या विद्यमाने पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत देशमुख बोलत होते. यावेळी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे राहुल नायर, डॉ. शुभांकर नंदा, डॉ. सागर श्राफ, सीमा माथुर, डॉ. सरोज वहाने, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात समृद्ध सहकार निर्माण झाला. शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय हा येथील शेतकऱ्यांच्या प्रमुख व्यवसाय बनल्याने या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये पर्यायाने तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली.

संगमनेर तालुक्यात पशुधन मोठे आहे. मात्र या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत अधिक प्रभावीपणे अंमलबजावणीची गरज आहे. यामध्ये गाय, म्हैस यामधील वांझपणाबाबत उपचार, खनिज मिक्सरचे दुधाळ गाईंमध्ये महत्त्व, हिरवा व कोरड्या चाऱ्याचे महत्त्व, कालवडीचे संगोपन, गोठ्याचे व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, घरच्याघरी खाद्य बनवायच्या पद्धती याबाबतही अधिक माहिती दूध उत्पादकाऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे.

पशुंच्या आरोग्याची जेवढे जास्त काळजी घेतली जाईल तेवढे जास्त प्रमाणात दूध उत्पादन देखील होईल. याकामी गावांमधील दूध संस्थांचे सचिव, पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधितांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. नायर म्हणाले, राजहंस दूध संघाने मुक्तसंचार गाय गोठा ही संकल्पना प्रभावीपणे राबवली. यामुळे गायींच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे.  नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्यावी असे ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ. शुभांकर नंदा, डॉ. सागर श्रॉफ, डॉ. सीमा माथुर, डॉ. सरोज वाहने यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 221
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

By अनंत पांगारकरJune 5, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत जे नाट्य घडले, त्याने केवळ जिल्ह्याचेच नाही तर…

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.