Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शारदा नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश लाहोटी, उपाध्यक्षपदी रोहित मणियार
शेती व सहकार

शारदा नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश लाहोटी, उपाध्यक्षपदी रोहित मणियार

संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची पतसंस्था
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 26, 2023Updated:April 26, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमधील पतसंस्था चळवळीतील अग्रेसर शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश लाहोटी यांची तर उपाध्यक्षपदी रोहित मणियार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाचे बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत अनुक्रमे लाहोटी आणि मणियार यांच्यावर आर्थिक वर्षासाठीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संस्थापकांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने आर्थिक शिस्त लावत प्रगतीची गरुडभरारी घेतली आहे. त्यांच्याच पदचिन्हावर आपण यापुढेही कार्यरत राहणार असल्याचा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

छोट्या-मोठ्या व्यवसायिकांसाठी अर्थवाहिनी ठरलेल्या शारदा नागरी पतसंस्थेने गत आर्थिक वर्षात 168 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. या आर्थिक वर्षात ठेवींचा हा टप्पा दोनशे कोटी रुपयांवर नेण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाने केला आहे. 128 कोटी 55 लाख रुपयांचे संस्थेने कर्ज वितरण केले आहे.

नूतन पदाधिकारी निवडी वेळी संस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांना अधिकाधिक गतीमान आणि चांगल्या सेवा देण्यासाठी संस्थेने मागील कालावधीत राबविलेल्या विविध योजना व प्रकल्पांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. व्यापार्‍यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, या हेतूने संस्थेची स्थापना झाली आहे. याच मार्गावर विद्यमान संचालक मंडळ कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

नूतन अध्यक्ष राजेश लाहोटी व उपाध्यक्ष रोहित मणियार यांनी संचालक मंडळाने विश्‍वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रामाणिक कर्जदार आणि समर्पित संचालक मंडळ या संस्थेच्या धोरणानुसार काम करताना संस्थेच्या प्रगतीसोबतच ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. निवडीप्रसंगी श्रीमती सुवर्णा मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, प्रकाश राठी, दीपक मणियार यांच्यासह संस्थेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 303
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

By अनंत पांगारकरJune 5, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत जे नाट्य घडले, त्याने केवळ जिल्ह्याचेच नाही तर…

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.