Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल मंत्र्यांच्या रडारवर तलाठी-ग्रामसेवक; वाळूमुळे महसूल खाते बदनाम करण्यासाठी कारणीभूत ठराल तर कारवाई करणार
राजकारण

महसूल मंत्र्यांच्या रडारवर तलाठी-ग्रामसेवक; वाळूमुळे महसूल खाते बदनाम करण्यासाठी कारणीभूत ठराल तर कारवाई करणार

संगमनेरमध्ये तलाठी ग्रामसेवकांना दिली समज
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरच्या पेटलेल्या वाळू तस्करीमुळे जर महसूल खाते बदनाम होणार असेल तर मला तुमच्यावर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील तलाठी, ग्रामसेवकांना इशारा दिला आहे.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्रीपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर संगमनेरच्या अवैध वाळू तस्करीकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे येथील वाळू तस्करीला काही अंशी लगाम बसला. तसेच राज्यभरातील वाळू तस्करी लक्षात घेत त्यांनी वाळू संदर्भात नवीन धोरण आणले आहे नव्या धोरणाची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून (१ मे) करण्यात येणार आहे.

असे असले तरी संगमनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांकडून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेली ही वाळू तस्करी रोखण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. किंबहुना या वाळू तस्करीमध्ये महसूलचे काही अधिकारी सामील असल्याचा आरोप होत असल्याने त्यामुळे ही तस्करी थांबू शकलेली नाही, असे देखील म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वी संगमनेरच्या गंगामाई घाटावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी घाट परिसरातील वाळू तस्करी थांबावी यासाठी अचानकपणे आंदोलनदेखील केले होते. तेव्हा केवळ तलाठ्याचा अपवाद वगळता महसूल खात्याचा कोणताही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नव्हता. या परिसरात दोन दिवस बंद असलेले वाळू तस्करी पुन्हा नव्या जोमात सुरू आहे. त्यामुळे वाळू तस्करी मध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा नागरिकांच्या आरोपाला पुष्टी मिळते.

संगमनेर मधून अद्यापही मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याच्या तक्रारी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे करण्यात येत असल्याने त्यांनी गुरुवारी संगमनेरमध्ये झालेल्या शासकीय आढावा बैठकीत यावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्‍यात एकीकडे आपण वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरु करीत आहोत. परंतू दुसरीकडे तुम्‍हीच जर महसूल खात्‍याला बदनाम करण्‍यासाठी कारणीभूत ठरत असाल तर मला कारवाई करण्‍याशिवाय गत्‍यंतर नाही, अशा शब्दात त्यांनी तलाठी, ग्रामसेवकांना याबाबत अतिशय कडक शब्दात समज दिली आहे.

त्यामुळे तलाठी, ग्रामसेवकांसह संगमनेरचे महसूल अधिकारी नव्या वाळूधोरणाची कठोरपणे अंमलबजावणी करतात की वाळू तस्करी ला प्रोत्साहन देऊन कारवाईला पात्र ठरतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 742
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.