Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डिजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्न लागावेत व विधवेची हेटाळणी टाळण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावांकरिता सरसावल्या ‘या’ रणरागिनी
सामाजिक

डिजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्न लागावेत व विधवेची हेटाळणी टाळण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावांकरिता सरसावल्या ‘या’ रणरागिनी

ग्रामसभामधून ठरावांद्वारे अंमलबजावणीची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2023Updated:01/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
डिजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्नविधी वेळेवर व्हावेत व विधवेची हेटाळणी टाळण्यासाठी गाव पातळीवर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभामध्ये ठराव घेण्यासाठी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिनींनी पुढे सरसावल्या आहे. चुकीच्या प्रथांविरोधात त्यांनी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन दिले. त्या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिले.

लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर तसेच मृत्युनंतर करण्यात येणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीमध्ये
वृषाली कडलग, ॲड. सीमा सातपुते, स्नेहलता कडलग, माधुरी शेवाळे, डॉ. नीलम शिंदे, डॉ. श्रद्धा वाणी, सुधा नवले, कस्तुरी शेवाळे आदींचा समावेश होता.

निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील काळात लग्न समारंभावर होणारी पैशांची उधळपट्टी वाढली आहे. लग्न वेळेवर लागत नाही. उशिरापर्यंत आलेल्या वऱ्हाडींना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो. मृत्युनंतर सुद्धा अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, कालबाह्य परंपरा वाढत चालल्या आहेत. मृत झालेल्या पुरुषांच्या बायकोची (विधवा महिलेची) अंधश्रद्धेतून हेटाळणी केले जाते. बहुजन समाजाने यातून बाहेर पडावे असे आवाहन करत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी. पुरुषोत्तम खेडेकर यांनी समाजाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी मद्यपान करून डिजेच्या तालावर नाचते. त्यामूळे व्यसनाधींनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. मोठ्या आवाजातील डीजेमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्णकर्कश डिजेच्या आवाजामुळे समाज, रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर या सर्व बाबी बंद व्हाव्यात यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) संपूर्ण महसूल विभागात डिजे मुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्न हे ठराव ग्रामपंचायतमार्फत ग्रामसभेत पास करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सूचना कराव्यात, अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांकडून करण्यात आली.

☆

समाजधुरीनांनी चुकीच्या प्रथाविरोधात आवाज उठवत बहुतांशी प्रथा बंद केल्या असल्या तरी आजही काही चुकीच्या प्रथा समाजात सुरूच आहे. पतीच्या निधनानंतर समाजात महिलांना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळत असते. अशा प्रथा असाव्यात, असे आपल्या राज्यघटनेत कुठेही म्हटलेले नाही. विधवा पुनर्विवाह यासाठी प्रयत्न आवश्यक असून या चुकीच्या प्रथांविरोधात काम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ॲड. सीमा सातपुते-काळे
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 791
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.