Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खरिपासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून द्या, जादा दराने विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवा: महसूल मंत्री विखे पाटील
राजकारण

खरिपासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून द्या, जादा दराने विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवा: महसूल मंत्री विखे पाटील

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विकास नलगे, कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, जादा दराने खत विक्री करणे, खतांचा साठा करून ठेवणे, लिंकिंग करणे अशा स्वरूपाची अवैध कामे करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कार्यवाही केली जावी. तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. तसेच अवैध विक्रीला पायबंध घालावा. निविष्ठा उपलब्धतेसंदर्भातील फलक दुकानाबाहेर लावण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी तक्रारीच्या निराकरणासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करा.

राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जावा. आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त अधिकाधिक शेतकऱ्यांना भरडधान्य लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्या. कृषी विभागाच्या योजनांचा मासिक आढावा घ्या. राहुरी विद्यापीठाच्या तज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा. मागील तीन वर्षापेक्षा जास्त कृषी पीक उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकारी व विद्यापीठाच्या तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

जलयुक्त शिवार टप्पा 2 साठी जिल्ह्यात 257 गावांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती देत यापुढे अधिक उत्साहाने ही योजना राबविली जावी. एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री विखे यांनी यावेळी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 183
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.