Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्नीच्या खून प्रकरणातून पतीची निर्दोष मुक्तता; संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
न्यायालय

पत्नीच्या खून प्रकरणातून पतीची निर्दोष मुक्तता; संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

पत्नीचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीची निर्दोष मुक्तता केली आहे. अकोले तालुक्यातील गाजलेल्या या खटल्याचा बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला. बाळासाहेब विठ्ठल आडांगळे (रा. उंचखडक, ता. अकोले) असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून बाळासाहेब आडांगळे यांनी पत्नी कल्पना हिला ‘तू उद्धट आहे, काही एक ऐकत नाही, काल तू माझ्या तावडीतून वाचली, आज तुला सोडणार नाही’, असे म्हणत तिच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर कुऱ्हाडीने व चाकूने मारून तिला गंभीर जखमी केले होते. पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून अकोले पोलीस ठाण्यात बाळासाहेब आडांगळे यांच्या विरोधात ११ सप्टेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आडांगळे यांच्या जखमी पत्नीवर मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. १४ सप्टेंबर २०१७ रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी तिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबांमध्ये पतीने मारहाण केल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. अकोले पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी याप्रकरणी तपास करत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात आरोप पत्र दाखल केले होते.

न्यायाधीश एस. डी. कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. विधी सहाय्य केंद्रामार्फत आरोपी बाळासाहेब आडांगळे यांचे वकीलपत्र ॲड. गौरव मालपाणी यांच्याकडे देण्यात आले होते. मालपाणी यांना या खटल्यामध्ये चंद्रशेखर संगमकर यांनी सहाय्य केले. खटल्या दरम्यान झालेल्या सुनावणी वेळी आरोपी आडांगळे गुन्हा घडला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नव्हता. असा बचाव करत खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षीमध्येही असलेली तफावत ॲड. मालपाणी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

सरकार पक्षाला आरोपी विरोधात आरोप सिद्ध करता आले नाही. त्यामुळे न्यायाधीश एस. डी. कुलकर्णी यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,106
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.