Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर; नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- आमदार बाळासाहेब थोरात
राजकारण

शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर; नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- आमदार बाळासाहेब थोरात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याकरता घेतले गेलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर होते. यामध्ये तत्कालीन राज्यपाल यांचे निर्णय, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या फुटीर गटाचा व्हीप याचा समावेश आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने सरकार पाडणे आणि सत्तेवर जाणे ही सत्तेची अभिलाषा ठेवून केलेली ही कृती असल्याचे निकालातून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर असून नैतिकतेच्या मुद्द्यावर विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर बोलताना थोरात म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार पाडण्यासाठी राज्यपाल यांचे निर्णय, विधानसभा अध्यक्ष यांचे निर्णय, फुटीर गटाचा व्हीप हे सर्व बेकायदेशीर होते. सत्तेसाठी कोणत्याही पद्धतीने सरकार पाडण्याचा तो प्रयत्न होता. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर हे सरकार नाही.

पक्षांतर बंदीचा कायदा हा यासाठी केला आहे की कोणीही फोडाफोडी करू नये. मूळ शिवसेना पक्षातून फुटलेले आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी आता निपक्षपातीपणे निर्णय घेतला पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्षपद कोणत्याही पक्षाशी निगडित नसून ते स्वायत्त असते.

सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला असता आणि ते जर त्यामध्ये हरले असते तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले असते. त्यामुळे सत्यता काय आहे ती सर्वांना कळते आहे. झालेला निर्णय हा शिंदे सरकारला अनुकूल नाही. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन इतिहास घडवावा.

आगामी काळात महाविकास आघाडी एकत्र राहून भक्कमपणे काम करेल. जनतेमध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. भाजप आणि शिवसेनेतून वेगळा झालेला गट याबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 257
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

June 1, 2026

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

By अनंत पांगारकरJune 4, 20260

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय…

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.