Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तहसील कार्यालयात चालविल्या गेलेल्या बेकायदेशीर सेतूचे साडेअठरा लाख रुपये वसूल करा अथवा तत्कालीन तहसीलदारांच्या पगारातून भाड्याची वसुली करा! सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

तहसील कार्यालयात चालविल्या गेलेल्या बेकायदेशीर सेतूचे साडेअठरा लाख रुपये वसूल करा अथवा तत्कालीन तहसीलदारांच्या पगारातून भाड्याची वसुली करा! सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांची मागणी

शासनाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2023Updated:12/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये विनापरवाना चालविल्या गेलेल्या सेतू कार्यालयाचे थकलेले १८ लाख ४७ हजार ४५६ रुपये भाडे संबंधितांकडून तात्काळ वसूल केले जावे अथवा २०१४ पासून आतापर्यंत येथे कार्यरत असलेल्या तहसीलदारांच्या पगारांमधून या भाड्याची रक्कम वसूल करावी तसेच शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खताळ यांच्या या मागणीमुळे संगमनेरच्या सेतूचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संगमनेर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये ऑगस्ट २०१४ पासून मार्च २०२३ पर्यंत अनधिकृतरित्या शारदा पतसंस्था वाघापूर संगमनेर व एपीएमसीएस लिमिटेड महा-ई-सेवा केंद्र गणेशनगर संगमनेर यांच्याकडून सेतू कार्यालय चालविले जात होते. यासंदर्भात नागरिकांनी खताळ यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर खताळ यांनी माहिती अधिकाराखाली तहसीलदारांकडे सेतू कार्यालयासाठी वापरात असलेल्या जागा वापरासंबंधी, परवानगी, भाडे करारनामा आदी संदर्भात माहिती मागविली होती.

यानंतर खताळ यांना मिळालेल्या माहितीत धक्कादायक प्रकार समोर आला. सेतू चालविण्यासंदर्भातील कुठलाही करारनामा करण्यात आलेला नाही. कोणत्याही भाड्याची आकारणी केली जात नसल्याचे स्पष्ट झाल्याने तहसील कार्यालयाच्या इमारतीत सेतू कार्यालय बेकायदेशीररित्या सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२२ ला तातडीने तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील सेतू कार्यालय तातडीने बंद करून घेतले गेले.

त्यामुळे खताळ यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये नऊ-दहा वर्ष विनापरवाना सेतू कार्यालयासाठी जागा वापरली असल्याने त्याचे भाडे तातडीने वसूल केले जावे यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे तत्कालीन तहसीलदारांनी सेतू चालकांकडे २०१४ ते २०२३ या कालखंडातील १८ लाख ४७ हजार ४५६ रुपये भाड्याची मागणी केली होती.

सेतू चालकांनी आत्तापर्यंत हे भाडे भरले नसल्याने या भाड्याची तात्काळ वसुली केली जावी, यासाठी खताळ यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. प्रशासनाने सेतू चालकांकडून हे थकित भाडे तातडीने वसूल करावे किंवा २०१४ पासून आत्तापर्यंत कार्यरत असलेल्या संबंधित सर्व तहसीलदारांच्या पगारातून या भाड्याची रक्कम वसूल केली जावी. तसेच शासकीय मालमत्तेचा गैरवापर असल्याचे माहिती असताना देखील शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी त्याच्या कालावधीतील संबंधित सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी खताळ यांनी केली आहे तसेच या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 706
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.