नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज)
ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले एक विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आहे. खासदार राऊत यांच्या विधानावरून त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
खासदार राऊत हे ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभासाठी नासिक मध्ये आले होते. याच विवाह समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने याच दिवशी अंतिम निकाल जाहीर केला होता.
दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान हा निकाल आला आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये उपस्थित होते. याच दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी एक विधान केले होते.
राऊत म्हणाले होते की, हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिंदे सरकार हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी या सरकारचे कोणतेही आदेश पाळू नये”. आता हे विधान त्यांच्या चांगले चांगले असल्याचे दिसते. राऊत यांचे विधान म्हणजे कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचे नाशिक पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्याचे हवालदार केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 505 (1) (ब), पोलिसांप्रती अप्रीतीची भावना, चिथावणे (1992 कायदा) यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

