Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर मर्चंट बँक निवडणूक: चार विरोधी उमेदवारांना संधी दिल्यास निवडणूक बिनविरोध; ज्ञानेश्वर कर्पे
राजकारण

संगमनेर मर्चंट बँक निवडणूक: चार विरोधी उमेदवारांना संधी दिल्यास निवडणूक बिनविरोध; ज्ञानेश्वर कर्पे

बिनविरोध निवडीसाठी विरोधकही आशावादी! 'या' चार उमेदवारांचा समावेश करण्याची मागणी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 18, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – पुढील महिन्यात संगमनेरातील अर्थकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेचे निवडणूक होत आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न सुरू केले असून चार विरोधी उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी सामावून घेतल्यास बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करण्यास तयार असल्याचे बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर कर्पे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना म्हटले आहे.

संगमनेर मर्चंट बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राखीव जागेवर राजेंद्र वाकचौरे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. उद्योगपती राजेश मालपाणी यांचे प्राबल्य असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत काही पारंपारिक विरोधक देखील आत्तापर्यंत सभासदांनी निवडून दिले आहे.

संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उमेदवारी अर्जाचे छाननी झाल्यानंतर विद्यमान संचालक व अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर कर्पे यांनी सत्ताधाऱ्यांनी जर चार विरोधी उमेदवारांना संधी दिली तर बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू, कोरोना काळात व्यापाऱ्यांचे झालेले मोठे आर्थिक नुकसान, संस्थेचा निवडणुकीवर होणारा खर्च टळावा, यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

बँकेच्या स्थापनेपासून संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांची बँकेवर एकहाती सत्ता राहिली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र राजेश मालपाणी यांनी देखील अपवाद वगळता बँकेचे धुरा आजतागायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. विरोधकांनी मालपाणी यांना सहकार शह देण्याचे प्रयत्न केल्याने बँकेच्या निवडणुकाही झाल्या असून संचालक मंडळ विरोधकांची देखील वर्णी लागलेली आहे.

व्यापाऱ्यांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी, लाखो रुपयांचा खर्च वाचावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय साधला गेल्यास निवडणुक बिनविरोध होऊ शकते. याला कर्पे यांनी दुजोरा दिला आहे. पारंपरिक विरोधक असलेल्या ज्ञानेश्वर कर्पे यांच्यासह प्रकाश कलंत्री, राजेश करवा आणि संदीप जाजू या चार विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी एकमताने संचालक मंडळात सामावून घेतले तर बँकेचे निवडणूक बिनविरोध होऊ शकते अशी प्रतिक्रिया कर्पे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मालपाणी यांच्या मंडळाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 996
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे.…

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.