Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच मोठ्या पॅकेजवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी
शिक्षण

एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच मोठ्या पॅकेजवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी

यापूर्वीही हजारो विद्यार्थ्यांना नोकरीच्या मिळाल्या संधी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

गुणवत्ता व उत्कृष्ट निकालाच्या परंपरेसह यूजीसीचे अनेक मानांकन आणि आयएसओ अवॉर्ड मिळालेल्या अमृतवाहिनी एमबीएच्या 45 विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच चांगल्या पॅकेजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली.

डॉ.लोंढे म्हणाले, माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी एमबीएने आपल्या गुणवत्तेचा लौकिक जपला. या महाविद्यालयातून 2286 विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली आहे. यामधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे.

यावर्षी विविध कंपन्यांनी संस्थेत येऊन घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यूमधून 45 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, विवंता ताज हॉटेल पुणे, लॉग चेक कंपोझिट इंडिया, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सोलुशन, इन्फोसिस लिमिटेड, इन्स्पायर कम्प्युटर्स, एबीके इम्पोर्ट लिमिटेड, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, डेसिमल पॉईंट सोल्युशन, इंडिया मार्ट, संगमनेरच्या मालपाणी ग्रुपसह विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.

अमृतवाहिनी एमबीएला नॅकचे मानांकन मिळाले असून संस्थेच्या गुणवत्तेमुळे व्यवस्थापन शास्त्रातील पीएचडी संशोधन केंद्र ही कार्यरत असून यामधून 27 विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ग्रंथालय, अत्याधुनिक इमारत, क्रीडांगण, प्लेसमेंट सुविधा, होस्टेल, निसर्गरम्य वातावरण यामुळे संस्थेला विविध पुरस्कारांसह या वर्षीचा ‘बेस्ट इमर्जिंग इन महाराष्ट्र’ हा पुरस्कार देखील मिळाला. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटकामी विभाग प्रमुख डॉ. नितीन भांड यांनी विशेष परिश्रम घेतले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ आदींनी अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 899
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी विद्यापीठाचे नाव गुणवत्तेमुळे देशात मोठे राहील: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

18/08/2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

17/07/2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.