Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वादाला कारणीभूत ठरलेली जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमणे नेस्तनाबुत!
प्रशासन

वादाला कारणीभूत ठरलेली जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमणे नेस्तनाबुत!

मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पालिकेची कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/05/2023Updated:30/05/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

दहशत अवैध व्यवसाय आणि गुंडागर्दीचा अड्डा म्हणून जोर्वे नाक्याची ओळख

महाराष्ट्र संवाद न्यूज

प्रतिनिधी – रविवारी रात्री शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेली हाणामारीची घटना आणि त्यामुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात झालेले तणावाचे वातावरण या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगत परिस्थिती नियंत्रणात ठेवली असली तरी या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. वादाला कारणीभूत ठरलेली अतिक्रमनेच नगर परिषदेच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच मोठ्या पोलीस फौज फाट्यासह नगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली कारवाई दुपारी बारा वाजेपर्यंत देखील सुरूच होती.

श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू होती. पोलिसांनी सुरुवातीलाच अतिक्रमण करण्यात आलेल्या भागाच्या दोन्ही बाजूने पोलीस बंदोबस्त तैनात केला त्यानंतर ही अतिक्रमणे काढण्यात आली. पथकाने केलेल्या या कारवाईचे संगमनेरात स्वागत होत आहे.

रविवारी रात्री जोर्वे नाका परिसरात गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून ग्रामीण भागातील युवकांना शंभर ते दीडशे जणांच्या टोळीने बेदम मारहाण करीत तलवार, चॉपर, काठ्या, लोखंडी रॉड, फाइटर याचा वापर करीत गंभीर जखमी केल्याची घटना संगमनेर शहरांमध्ये घडली. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हेगारांना कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

त्यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी सोमवारपासून जोरदार कारवाई सुरू करीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाऊले टाकली. घटनेनंतर संगमनेर शहरात विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विविध उपविभागातले पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, एसआरपीसह मोठा पोलीस फौजफाटा संगमनेरमधे तैनात करण्यात आला आहे. रात्रभर आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू होती.

तर दुसरीकडे मंगळवारी सकाळपासूनच संगमनेर नगरपालिकेने जोर्वे नाका परिसरात असलेली अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तरुणांना गंभीर मारहाण करून  दहशत निर्माण करणारे आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि अतिक्रमण करणाऱ्या विविध टपऱ्यांमध्ये, दुकानांमध्ये तसेच वाळू तस्करीमध्ये सुद्धा सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे.

जोर्वे नाक्यावर विविध टपऱ्या आणि दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून हा रस्ता अतिशय चिवळ करून ठेवला होता. त्यातच येथे हे रिक्षा आणि जीप थांबा बेकायदेशीररित्या करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. जुना पुणे नाशिक महामार्गावर असलेला हा नाका नेहमी चर्चेचा विषय ठरलेला आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी अशाच अनेक घटना झाल्या आहेत. वारंवार याकडे दुर्लक्ष केल्याने तेथील अतिक्रमण वाढत गेले. आज अतिक्रमण काढण्यासाठी ‘हाणामारीचे’ कारण घडावे लागले. मात्र यासाठी अशा कारणांची वाट न पाहता नगर परिषदेने शहरातील सर्वच भाग अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी आता जोर धरीत आहे.

छायाचित्रे : काशिनाथ गोसावी

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,977
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.