Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संपूर्ण संगमनेर तालुका एक आदर्श परिवार : आमदार थोरात
शेती व सहकार

संपूर्ण संगमनेर तालुका एक आदर्श परिवार : आमदार थोरात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/05/2023Updated:30/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान

संगमनेर तालुक्यात सर्वांना सन्मानाची वागणूक

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संगमनेर तालुक्याचा सहकार वाटचाल करत असून आज सहकाराचे आदर्शवत मॉडेल हा तालुका ठरला आहे. कारखान्याच्या विकासात कामगारांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून तालुक्यात शेतकरी, कामगार, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह सर्वांना सन्मान दिला जात असून तालुक्यातील वातावरण हे एक परिवारासारखे आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 29 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, नवनाथ आरगडे, रामदास वाघ, चंद्रकांत कडलग, संपतराव गोडगे, रमेश गुंजाळ, मीनानाथ वरपे, विनोद हासे, भाऊसाहेब शिंदे, संभाजी वाकचौरे, ॲड. सुहास आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, हौशीराम सोनवणे, किरण कानवडे ॲड. शरद गुंजाळ, विठ्ठल असावा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, सेवानिवृत्ती हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. जीवनाचा महत्त्वाचा कालखंड आपण कारखान्याच्या सेवेत दिला असून कारखान्यानेही कायम कामगारांचा सन्मान केला आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत आपल्या सर्वांचा सहभाग असून तालुक्यात शांतता, सुसंस्कृतपणा व आनंदाचे वातावरण आहे. हे आपल्याला पुढे जपायचे आहे.

संगमनेरचा सहकार हा राज्याला दिशादर्शक ठरत असून साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, बँक, शैक्षणिक संस्था या राज्यात अग्रक्रमांकाच्या आहेत. सहकारामुळे ग्रामीण भागात समृद्धी निर्माण झाली असून तालुका विकसित झाला आहे. आज तालुक्याचा आणि आपला राज्य पातळीवर देशपातळीवर सन्मान होतो आहे. यामध्ये सर्वांचाच मोलाचा सहभाग आहे. यापुढील काळातही सर्वांनी कार्यमग्न राहून स्वतःचे आरोग्य जपताना कुटुंबासह समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले

प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.

कामगारांच्या मुलांनी मानले आमदार थोरात यांचे आभार

सेवापूर्ती सोहळ्यात विविध कामगारांच्या उच्चशिक्षित मुलांनी आपल्या कुटुंबाच्या व आपल्या जीवनात झालेली प्रगती याविषयी बोलताना कारखाना व आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे आपल्याला पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठा मान सन्मान मिळत असून संगमनेरकर म्हणून सर्वत्र गौरव होतो आहे. याचे सर्व श्रेय आमदार थोरात यांच्या नेतृत्वाला असल्याचे उच्चशिक्षित असलेल्या शुभांगी वर्पे, राधाकिसन कानवडे, सुयोग कुळधरण व ऋषिकेश सातपुते यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 325
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका…

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.