Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे शासनाचे धोरण – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राजकारण

शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे शासनाचे धोरण – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वाळू माफीया नव्या धोरणाला बदनाम करण्याचे प्रयत्‍न करीत आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून सर्व शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांसह अस्तगाव परिसरातील गावांमधील नागरिकांच्या भेटी घेवून ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचना दिल्या. शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड, बांधकाम विभागाचे देविदास धापटकर आदी यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न आणि शासकीय कार्यालयात कागदपत्र किंवा योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची आता सरकारने मुदतही ३० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

मागील काही दिवसात महसूल विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेवून लोकाभिमुख निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. यामध्ये प्रामुख्याने ६०० रुपये दराने वाळू उपलब्ध करून दिली. वाळू माफियांना मोठी धास्ती या निर्णयाची आहे. सध्या वाळू माफीया नव्या धोरणाला बदनाम करण्याचे प्रयत्‍न करीत आहेत. मात्र कोणाच्याही दबावाला बळी न पडता हे धोरण यशस्वी करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाला. आता शासकीय कामांना क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. नव्या वाळू धोरणात घरकुलाच्या लाभधारकांसाठी पाच ब्रॉस वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला.

महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शिवरस्ते, पानंद रस्ते जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले असून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आणि नकाशात दिसणारे रस्ते तातडीने मोकळे करून देण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. रोवरच्‍या सहाय्याने मोजणीची प्रकरण मोठ्या प्रमाणात निकाली निघत असून, याचाही मोठा दिलासा शेतक-यांना मिळणार आहे.

कृषी विकासासाठी राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून पुर्वी आपण कोरडवाहू शेती अभियानातून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला होता. त्याच धर्तीवर आता मागेल त्याला शेततळे शेडनेट अस्तरीकरणासाठी कागद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विमा योजनेतही महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांवर कोणताही अर्थिक भार येवू न देता अवघ्या एक रुपयात सरकारच पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणार आहे.

शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जमीनीचा जनहितार्थ उपयोग करून घेण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिली असून, साकुरी येथील पाणी योजना, मुस्लीम समाजाकरीता कब्रस्थान आणि घनकचरा प्रकल्पासाठी या माध्यमातून जागेची उपलब्धता होईल. औद्योगिक विकासासासाठी आयटी पार्क, लॉजेस्टिक पार्क उभारून रोजगार निर्मितीला या जागेची मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 453
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.