Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर उपविभागात आता गुन्हेगारांची गय नाही; पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा पत्रकारांशी संवाद
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर उपविभागात आता गुन्हेगारांची गय नाही; पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा पत्रकारांशी संवाद

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे. अद्यापही काही आरोपींचा शोध सुरू असून यापुढे कोणत्याही गुन्ह्यातील ‘गुन्हेगाराला’ पाठीशी घातले जाणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. या उपविभागात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार आता तडीपार होतील किंवा तुरुंगात असतील, अशा पद्धतीने पोलीस कारवाई होणार असल्याचे संकेत संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले आहे.

वाघचौरे यांनी संगमनेर उपविभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर रविवारी प्रथमत:च पत्रकार परिषद घेत आपल्या कामाची पद्धत विशद केली. नागपूर, भुसावळ येथे केलेल्या लक्षवेधी कामासंदर्भात माहिती देताना त्यांनी या संगमनेर उपविभागात देखील काही वेगळे प्रयोग करून गुन्हेगारीचा बिमोड करणार असल्याचे स्पष्ट केले. गुन्ह्यांच्या शोध लावण्यासोबतच गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी आपले प्राधान्य असेल असे ते म्हणाले.

नागपूरमध्ये बड्या धेडांचा समावेश असलेल्या भूमाफिया टोळीवर कारवाई केली आहे. नऊ वर्षानंतर देखील ही टोळी अद्यापही तुरुंगात असून अनेक छोटे-मोठे भूखंड आपण संबंधितांना परत मिळवून दिले. भुसावळ सारख्या शहरातही गुन्हेगारी मोडीत काढत ऐंशीहून अधिक गुन्हेगारांना तडीपार केले. संगमनेरमध्ये देखील काम करताना आपण प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी व अकोले तालुक्यातील अकोले आणि राजुर पोलीस ठाण्यातील दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्याचे काम चालू असून अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गुन्हेगार कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई अटळ आहे.

शहरात बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून विनापरवानगी फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केली जातील. शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, दुचाकी चोरी रोखण्यासाठी देखील पोलीस सतर्क असतील. अवैध वाहतूक विना क्रमांकाची वाहने मोठ्या आवाजातील सायलेन्सर लावून भरधाव वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाया केल्या जाणार आहेत. शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पथक नेमले जाईल. या विभागात गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सतर्क राहणार असल्याचे वाघचौरे यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 884
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.