Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचारा विरोधात संगमनेरात अभूतपूर्व भगवा मोर्चा; स्वयंस्फूर्तीचा बंद देखील शंभर टक्के यशस्वी
आंदोलन

हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचारा विरोधात संगमनेरात अभूतपूर्व भगवा मोर्चा; स्वयंस्फूर्तीचा बंद देखील शंभर टक्के यशस्वी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – लव्ह जिहाद सारख्या वाढत्या घटनांसह विविध अत्याचारा विरोधात संगमनेरमध्ये हिंदू समाज एकवटला होता. अभूतपूर्व असा भव्य भगवा मोर्चा मंगळवारी सकाळी संगमनेरमध्ये काढण्यात आला. मोर्चाला हजारोंची उपस्थिती होती. यात महिला तरुणींची संख्या देखील लक्षणीय होती. याच बरोबरीने संगमनेर शहर आणि तालुक्यात आज स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चानंतर देखील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय विविध आस्थापना बंदच होत्या.

छायाचित्र काशिनाथ गोसावी, संदीप चव्हाण
छायाचित्र काशिनाथ गोसावी, संदीप चव्हाण

मंगळवारी सकाळी नगरपरिषदेसमोरून या भव्य भगवा मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा ज्यावेळी नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला त्यावेळी त्याचे दुसरे टोक बाजारपेठेत होते. यावरून उपस्थितीचा अंदाज येतो. 25 ते 30 हजारावर नागरिक या मोर्चात सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. मोर्चातील जय जय सियाराम, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी संगमनेर दणाणून गेले होते. समाजाच्या सर्व स्तरातील व सर्वपक्षीय लोक या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.
मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एसआरपी, दंगल नियंत्रण पथक आदींसह विविध पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. याशिवाय अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.
देशभरातील लव्ह जिहाद सारख्या वाढत्या घटना, धर्मांतराचे प्रकार याशिवाय गेल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील आठ हिंदू तरुणांवर धारदार शस्त्रांचा वापर करत झालेला प्राणघातक हल्ला यामुळे समाजामध्ये रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. या विरोधात मंगळवारी संगमनेरमध्ये निघालेला मोर्चा लक्षवेधी ठरला आहे. केवळ संगमनेर मधीलच नव्हे तर आसपासच्या गावांमधील लोक देखील या मोर्चात सहभागी झाले होते. तसेच नागरिकांनी स्वयंस्पर्तीने पाळलेल्या बंदला देखील अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता 100% प्रतिसाद मिळाला.
मोर्चा नवीन नगर रोड रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यानंतर येथे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय प्रमुख शंकर गायकर आणि दिल्लीतील सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांची भाषणे झाली.
चव्हाणके यांनी आपल्या भाषणात संगमनेर, श्रीरामपूर आणि बीड ही लव्ह जिहादची प्रमुख केंद्रे झाले असल्याचे सांगत येथे वीस मिनिटात तीन केसेस समोर आल्या. देशभरात एक कोटीहून अधिक मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. त्यामुळे या विरोधात कडक कायदा आणण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षात रहा मात्र, हिंदू म्हणून एक रहा. ती आज काळाची गरज बनली आहे. संगमनेरमध्ये लव्ह जिहाद बरोबरच धर्मांतराचे प्रकार सुरू आहेत. या जिहाद्यांचा सर्व खर्च कसायांकडून भागविला जात असल्याने येथील अनधिकृत कत्तलखाने बंद झाले पाहिजे गाईंच्या कत्तलीसाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरेल असा कायदा आणला पाहिजे. गड किल्ल्यांवरील मदारी, मदरशे काढून टाका. साडेअठरा टक्के लोकसंख्येने असलेले मुस्लिम या देशात अल्पसंख्यांक कसे ठरतात असा सवाल करत भारत हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी त्यांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 854
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.