Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा समाज कल्याण विभागाचा प्रयत्न; प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ
सामाजिक

योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा समाज कल्याण विभागाचा प्रयत्न; प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ

समान संधी केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची मार्गदर्शन कार्यशाळा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 8, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – तळागाळातील समाजघटकांसाठी योजना राबवितांना जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, निवासी आश्रम शाळा, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्त्यांचे समाज कल्याण विभागाला नेहमीच सहकार्य लाभले. या पाठबळामुळेच सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे प्रतिपादन नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी केले.

नाशिक समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालय व अहमदनगर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्यावतीने समान संधी केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त अनिशा शेख, संशोधन अधिकारी भाऊ खरे, समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, भटके विमुक्त कल्याण समितीच्या निमंत्रक मुमताज शेख, समाज कल्याण विभाग अहमदनगरचे अशासकीय सदस्य ॲड. डॉ. अरुण जाधव, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर शेख आदी उपस्थित होते.

वाघ म्हणाले, समाज कल्याण विभागाच्या सर्व योजनांच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत. मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन व सहाय्य करावे. २६ मे ते २६ जून २०२३ या कालावधीत राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबद्दल जनजागृती करून लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासन करित आहे.

इयत्ता १० वीच्या शासकीय निवासी शाळांतील १०० टक्के निकाल लावणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अनिशा शेख, ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील आश्रम शाळा, शासकीय निवासी शाळा, वसतिगृहाचे अधीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात जामखेड तालुक्यातील भटके विमुक्त समूहातील काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात जातीचे दाखले व रेशनकार्डचे वितरण करण्यात आले. राधाकिसन देवढे यांनी प्रास्ताविक केले. शाकीर शेख यांनी सूत्रसंचालन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 302
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.