Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये दंगल कशी होईल, वातावरण खराब कसं होईल याचा हेतू पुरस्सर प्रयत्न; माजी मंत्री आमदार थोरात यांचा गंभीर आरोप
राजकारण

संगमनेरमध्ये दंगल कशी होईल, वातावरण खराब कसं होईल याचा हेतू पुरस्सर प्रयत्न; माजी मंत्री आमदार थोरात यांचा गंभीर आरोप

ते इकडे मोडायला येतात आम्ही तिकडे घडवायला जात आहोत!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2023Updated:08/06/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – एकीकडे वर्षाच्या परिश्रमातून सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा असा निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी येत असताना सर्वांनीच जल्लोष करावा असा दिवस असताना दुसरीकडे मात्र काही लोक संगमनेरमध्ये दंगल कशी होईल, येथील वातावरण खराब कसं होईल याचा हेतू पुरस्सर प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.

निळवंडे येथे तळेगाव गट व संगमनेर तालुक्यासह दुष्काळी 182 गावांच्यावतीने बुधवारी आयोजित जलपूजन कार्यक्रमप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, अविनाश सोनवणे, जगन्नाथ घुगरकर आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, कोणी गुन्हा केला असेल तर त्याला इतकी कडक शिक्षा व्हायला हवी ती पुन्हा तोच गुन्हा करण्याची त्याची वासना व्हायला नको. मात्र तालुक्यातील अशा विषयाचे भांडवल करून त्याकडे संधी म्हणून बघत मोर्चे करून त्या माध्यमातून येथील वातावरण, बाजारपेठेचे वातावरण बिघडवून टाकायचं. मोर्चादरम्यान कोणतेही अनुचित घटना घडली नाही हे अभिनंदनीय होते. मात्र दंगल घडवायचीच या हेतूने मोर्चामध्ये काही लोक सोडले होते. त्यासाठी जे पाहिजे ते करा अशा सूचना त्यांना दिल्या गेल्या होत्या. संगमनेरचा जावई असल्याचे सांगणाऱ्याने येथील वातावरण बिघडविण्याचे काम केले.

सकाळी-सकाळी दिल्ली नाक्यावरील दुकान फोडले. परत जाताना समनापुरमध्ये काहीही संबंध नसणाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. त्यातून दंगल घडावी हा त्यामागचा हेतू होता. संगमनेरवाले आपल्याला आवरत नाही, ते मोडत नाही, उलट उभारी घेतात. त्यामुळे आता उलट्या पद्धतीने जाऊ असा विचार करणारे काही लोक येथील जनतेचे संसार मोडायला निघाले आहे. संगमनेरचे चांगले पाहवत नाही म्हणून असले उद्योग हेतू पूरस्सर सुरू आहे. काही लोक हे जाणीवपूर्वक करत आहेत.

कोणी चुकत असेल तर त्याला जरूर शिक्षा झाली पाहिजे मात्र त्यासाठी सगळ्या समाजाला दोष देणे योग्य नाही. विकासाचे काम त्यांना करायचे नाही. येथील विकास त्यांना बघवत नाही. त्यामुळे मते मिळविण्यासाठी आता सोपा उपाय म्हणून जातीचे धर्माचे राजकारण सुरू झाले आहे. आपल्याला सगळ्या पद्धतीने मोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीत आपला तालुका असा सांभाळा की ज्याचा आदर्श राज्यात सर्वत्र घेतला गेला पाहिजे.

अशा विचारांपासून आपल्याला राज्याला, देशाला जपायचे आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात कोल्हापूर, शेवगाव, बाळापुर अकोला, अमरावती आदी ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण केले गेले आहे. भांडणे लावा, दंगली घडवा, आपोआप मते फिरतील आणि आपण पुन्हा सत्तेवर जाऊ एवढाच उपाय आता त्यांच्याकडे उरला असल्याची टिका थोरात यांनी केली.

गणेशच्या निवडणुकीत सहभाग
तुम्ही इकडे मोडायला येता आम्ही तिकडे घडवायला जात आहोत. गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस आपल्याला आणावा लागतो. जेथे कारखाना चालतो तेथे चैतन्य निर्माण होते. आपल्यासारखे चैतन्य तेथे निर्माण व्हावे यासाठी, आपण एकीकडे गणेश घडवायला चाललो आहोत. तर दुसरीकडे संगमनेरमधील ‘सुकून’ ते मोडायला, पेटवायला निघाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,173
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.