Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सकल हिंदू समाजाच्या मोर्चात सहभागी न होता मोर्चावर टीका करणाऱ्यांचे मनसुभे उघड !
राजकारण

सकल हिंदू समाजाच्या मोर्चात सहभागी न होता मोर्चावर टीका करणाऱ्यांचे मनसुभे उघड !

हिंदू समाजाच्या भावना दुखविणाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – जोर्वे गावातील युवकांवर एका समाजाकडून हल्ले झाल्यानंतर शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याऱ्या आ. बाळासाहेब थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर दंगल घडविण्याचा केलेला आरोप हा अतिशय दुर्दैवी असल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, अमोल खताळ, गोकुळ दिघे, राहुल दिघे, राहुल भोईर, बापूसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जोर्वे आणि पंचक्रोशीतील गावांमधून संगमनेर शहरात येणाऱ्या शेतकरी, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना होत असलेल्या त्रास तसेच संगमनेर मध्ये सुरु असलेले लव्ह जिहाद प्रकरणे, लँड जिहाद, पोलिसांवरील हल्ले, नुकतेच जोर्वे गावातील शेतकरी यांच्यावर झालेला हल्ला या त्रासाची स्वाभाविक प्रतिक्रिया हा मोर्चा काढण्या मागे होती. परंतु या भावनाचा आदर न करता मोर्चाला भेटलेल्या उदंड प्रतिसादामुळे व्यथित झालेल्या आ. थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चामधील सहभागी 50 हजार पुढील हिंदू बांधवांचा एक प्रकारे अपमान केला आहे. मोर्चा दंगल घडविण्यासाठी होता हा त्यांचा आरोप अतिशय बिनबुडाचा व केविलवाणा आहे.

तालुक्यात लव्ह जिहादच्या व धर्मांतराच्या घटनांची संख्या वाढत चालली आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, केवळ एका समाजाला पाठीशी घालण्याचे काम आ. थोरातांकडून केवळ स्वत:च्या राजकारणासाठी केले जात आहे. तुमच्याच जोर्वे गावातील युवकांना मारहाण झाल्यानंतर त्यांची विचारपूस करणे तुमचे कर्तव्य होते, पण त्यावर कोणतेही भाष्य न करता थेट मोर्चावर दंगलीचा आरोप करून आपण हिंदू समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखवित आहात. ग्रामीण भागातील मुली, महिलांवर होणारी अश्लील शेरेबाजी, छेडछड, युवकांना होणारी मारहाण यावर मात्र आपण ४० वर्षापासून गप्प आहात.

मोर्चा झाल्यावर वाद घडवून आणून पुन्हा सकल हिंदू समाज एकत्र येऊ नये यासाठी झालेले हे एक षडयंत्र तर नाही ना ? अटक असलेल्या आरोपीमध्ये कोणत्या पक्षाचे लोक आहे हे न पाहता सकल हिंदू समाज त्यांना एक हिंदू म्हणून मदत करत आहे. पण आपण आपली राजकीय सोय पाहत आहात. यांचे हिंदू समाजाला दुःख आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपण एखाद्या वाचाळवीरासारखे दंगल दंगल करत आहात.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण काढलेले पत्र सुद्धा एका विशीष्ट समाजाची पाठराखण करणारे होते, तुमच्या पत्रामुळेच हिंदू समाजाची भावना अधिक तीव्र बनली. याबाबत आपण मोर्चाला जाऊ नका यासाठी बैठका घेऊन सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारून मोर्चामध्ये उस्फुर्त सहभाग घेतला यांचे दुःख आपणास झाले ते आपण बोलून दाखविले. तुमच्या पत्राचा निषेध म्हणूनच लाखो हिंदू समाज या मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला आणि एक प्रकारे आपण काढलेल्या पत्राच्या विरोधातील संतप्त भावना या मोर्चातून व्यक्त झाली यांचे दुख: तुम्हाला बोचत आहे. आपण केलेले निराधार आरोप मागे घेऊन हिंदू समाजाची माफी मागावी अन्यथा समाज आपणास माफ करणार नाही, असे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,584
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.