Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोपरगावच्या दर्शना पवारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण… खुनाचा गुन्हा दाखल; पोलिसांची पाच पथके घेताहेत आरोपीचा शोध
गुन्हेगारी

कोपरगावच्या दर्शना पवारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण… खुनाचा गुन्हा दाखल; पोलिसांची पाच पथके घेताहेत आरोपीचा शोध

किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/06/2023Updated:20/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे – एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सहाव्या आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाल आहे. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे तिच्या मृत्यू झाल्याचा अहवाल पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत आहे.

दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत रविवारी आढळून आल्याने याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. दर्शना दत्ता पवार ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिने राज्यातून सहाव्या क्रमांकाने यश मिळवले होते.

त्यामुळे पुण्यातील एका अॅकडमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभासाठी ती 9 जूनला पुण्यात आली होती आणि नर्हे येथील एका मैत्रिणीकडे राहत होती. 12 जूनला तिने आपल्या मैत्रिणीला सिंहगड किल्ल्यावर ट्रेकींगसाठी जात असल्याचे सांगितले होते. कुटुंबाला देखील याबाबत तिने कल्पना दिली होती.

मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिचा फोन बंद झाला आणि फोन बंद झाल्यामुळे तिच्या कुटुंबाने तीन दिवस तिचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.

रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याला झाडांमध्ये दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिचा मोबाईल आणि इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या. सिंहगड किल्ल्यावर जातेवेळी तिच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील राहुल दत्तात्रय हंडोरे हा देखील असल्याची माहिती समोर आली आहे. राजगडावर हे दोघेही दुचाकीवरून गेले होते. दोघेही गडावर सोबत जात होते मात्र नंतर राहुल एकटाच परत येत असल्याची माहिती जवळच्या सीसीटीव्हीतून समोर आली आहे.

राहुल हा देखील बेपत्ता असून पोलिसांची संशयाची सुई त्याच्या दिशेने आहे. राहुल हंडोरे यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना परराज्यात दिसत असून त्याने दुसऱ्याच्या फोनवरून घरच्यांसोबत संपर्क साधला असल्याची माहिती पुढे आली आहे. राहुल पोलिसांसमोर आल्यानंतरच या घातपात प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान या संदर्भात वेल्हे पोलीस ठाण्यात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची पाच पथके आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,236
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.