Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलीस कत्तलखान्यात पोहचले आणि ४३ गोवंश जनावरांची… मंगळवारी रात्रीची केली कारवाई
गुन्हेगारी

पोलीस कत्तलखान्यात पोहचले आणि ४३ गोवंश जनावरांची… मंगळवारी रात्रीची केली कारवाई

कारवाईत जिवंत गोवंश जनावरे वाचविण्यात यश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यासंदर्भात पोलीस प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मंगळवारी रात्री पोलीस प्रशासनाने दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल ४३ जिवंत गोवंश जनावरे कत्तली होण्यापूर्वीच वाचविली आहेत. विशेष म्हणजे यातील एका कारवाईत जिवंत गोवंश जनावरांनी आरडाओरडा करू नये, यासाठी कत्तलखाना चालकाने गोवंश जनावरांच्या तोंडाला काळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या चिकटविण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात दोघा कत्तलखाने चालकांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित सन १९९५ कलम ५, ९(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया करण्यात आल्या.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विवेक दत्तू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिली कारवाई शहरातील भारत नगरमध्ये करण्यात आली. पोलीस पथकाने मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास भारत नगर मधील सुफियान कुरेशी यांच्या वाड्यात छापा टाकला असता तेथे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांना १६ गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवले असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी सुमारे एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यासंदर्भात राजीक मुनीर शहा (रा. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल अजित बाळकृष्ण कुऱ्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुसऱ्या कारवाईमध्ये आरोपी राजिक रज्जाक शेख (रा. भारत नगर, संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक नऊमध्ये कारवाई केली.

या कारवाईत एका पत्र्याच्या शेडमध्ये २७ जिवंत वासरांच्या तोंडाला काळ्या चिकटपट्ट्या लावून त्यांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवले असल्याचे समोर आले. या कारवाईत पोलिसांनी एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,192
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.