Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भगवा मोर्चा प्रकरणी तिघांवर गुन्हे; सुदर्शन चॅनलचे सुरेश चव्हाणके यांच्यासह बजरंग दलाच्या दोघांचा समावेश
गुन्हेगारी

भगवा मोर्चा प्रकरणी तिघांवर गुन्हे; सुदर्शन चॅनलचे सुरेश चव्हाणके यांच्यासह बजरंग दलाच्या दोघांचा समावेश

जातीय तेढ, चितावणीखोर वक्तव्य, धार्मिक तेढ निर्माण करणारी भाषणे केल्याचे कारणावरून गुन्हा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा जूनला सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या भगव्या मोर्चाच्यावेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चितावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्चाच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुदर्शन चॅनलचे संपादक व भगवा मोर्चातील प्रमुख वक्ते सुरेश चव्हाणके यांच्यासह योगेश मनोहर सूर्यवंशी व विशाल भगवान वाकचौरे यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादीवरुन या तिघांवर गु.र.नं. ५१२/२०२३ भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ३४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भगवा मोर्चासाठी प्रशासनाकडून अटी, शर्तीवर परवानगी देण्यात आली होती. बजरंग दलाच्या विशाल भगवान वाकचौरे यांच्यासह इतरांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या मोर्चाचे रूपांतर शेवटी सभेत झाले होते. मोर्चामध्ये 18 ते 20 हजारांचा जनसमुदाय सहभागी झाला होता. सभा संपल्यानंतर प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सभेदरम्यान योगेश सूर्यवंशी आणि सुरेश चव्हाणके यांनी प्रक्षोभक भाषणे केली असल्याचे तक्रारीत म्हटले असून प्रशासनाने या भाषणांचा बारकाईने अभ्यास करत संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये गुन्हा दाखल झालेल्यांनी जातीय दंगा घडवून आणण्याकरिता बेछूटपणे, बेदरकारपणे चितावणी देणारे भाषणे करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या परवानगीमधील अटी, शर्ती व सर्वोच्च न्यायालयाने याचिकेद्वारे निर्गमित केलेल्या न्याय निर्णयाचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

या सभेचे सूत्रसंचालन आरएसएसचे अक्षय उर्फ ज्ञानेश्वर थोरात यांनी केले होते. प्रस्तावना एकलव्य आदिवासी संघटना व बजरंग दलाचे योगेश सूर्यवंशी यांनी केली तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कुलदीपसिंह ठाकुर यांनी निवेदन वाचन केले होते.

जोर्वेनाका घटनेनंतर संगमनेर शहर व तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटने पाठोपाठ जोर्वे व समनापुर येथे या घटनेचे पडसाद उमटले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेरात ठाण मांडल्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तब्बल तीन आठवड्यानंतर जोर्वे नाका घटनेतील आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

मोर्चानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळील जाणता राजा मैदानावरील रस्त्यावर देखील थोरात यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर उशिराने यासंदर्भात गुन्हा दाखल केल्याचे बोलले जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,101
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.