महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या “बेहत्तर भारत की बुनियाद” या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
आमदार थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी अहमदनगरमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. बैठकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी या सर्वांशी संवाद साधत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याची माहिती जाणून घेतली. या बैठकीत युवक काँग्रेसच्या होऊ घातलेल्या उपक्रमाच्या पोस्टरचे प्रकाशन देखील करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्रदेश सचिव दीप चव्हाण, जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष स्मितल वाबळे आदी यावेळी उपस्थित होते.

