Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात घडलेली घटना लोकशाही आणि राज्य घटनेकरिता दुर्दैवी – आमदार थोरात
राजकारण

राज्यात घडलेली घटना लोकशाही आणि राज्य घटनेकरिता दुर्दैवी – आमदार थोरात

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 2, 2023Updated:July 2, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

जनतेच्या न्यायालयातच सगळा निर्णय होईल, जनता सर्व पाहते आहे

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी लावणारे आहे. घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटनेकरता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आजच्या शपथविधीची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही व राज्यघटनेकरता दुर्दैवाची आहे . पुढील काळात देश कसा चालेल हे काळजी वाटण्यासारखे आहे. पक्ष, पद्धत, विचार घेऊन आपण पुढे जातो. कायम सत्ता पाहिजे असा खेळ सुरू झाला तर लोकशाही व्यवस्था अडचणीत येईल.

मागील वर्षापासून राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ, घडलेल्या सर्व घटना राज्यातील जनता पहात आहे. जनतेला असे राजकारण नको आहे. असे राजकारण जेव्हा जनतेच्या न्यायालय जाईल तेव्हा जनता योग्य निर्णय देईल. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे. जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आले आहे. मागच्या वाक्यांची तुलना केली तर किती टोकाची होऊ शकते हे आता जनता पाहते.

राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे लोकसभेला 38 आणि विधानसभेला 180 जागा निवडून येण्याचा अंदाज विविध सर्व्हेनी दिला आहे. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. आगामी काळात सत्ता मिळावी की टिकावी याकरता काहीही केले जात आहे. लोकशाहीची मोडतोड होत आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते सत्तेसोबत गेले हे नक्कीच काळजी वाटणारे आहे.

काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 838
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 5, 20260

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. नोकरीच्या ठिकाणी…

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.