Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साईचरणी; द्वारकामाई, गुरूस्थानचे दर्शन, श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट
महाराष्ट्र संवाद विशेष

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साईचरणी; द्वारकामाई, गुरूस्थानचे दर्शन, श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा वस्तुसंग्रहालयास भेट दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रमुख जिल्हा व सत्र ‌न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिरात आगमन झाल्यावर प्रथम त्यांनी ‘द्वारकामाई’चे दर्शन घेतले. त्यानंतर साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरूस्थान मंदीर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली. साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या साईबाबा वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती मुर्मू यांनी भेट दिली. पी. सिवाशंकर यांनी त्यांना वस्तुसंग्रहालयातील वस्तू आणि प्रतिमांविषयी माहिती दिली.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रपतींचा सत्कार केला. संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर यांनी राष्ट्रपतींचा साईबाबांची मूर्ती भेट देत सन्मान केला. साई दर्शनानंतर साईबाबा प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचा आस्वाद घेतला.

भाविकांच्या शुभेच्छांचा स्वीकार…

साईदर्शन झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षा वाहनांचा ताफा प्रसादालयाकडे मार्गक्रमण करत असतांना गेट नंबर १ येथे राष्ट्रपती मुर्मू यांनी ताफ्यातील गाड्या थांबवत गाडीतून खाली उतरत काही पावले चालत जाऊन सर्वसामान्य भाविकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. राष्ट्रपतींच्या या साधेपणाचे भाविकांना कौतूक वाटले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 748
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

26/10/2026

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

By Annant Ppangarkar27/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगार यांच्या हिताला प्राधान्य देण्याची परंपरा…

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.