Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शुभांगी पाटलांचा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सल्ला… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवा आणि गद्दारांना घरी बसवा
राजकारण

शुभांगी पाटलांचा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सल्ला… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवा आणि गद्दारांना घरी बसवा

संगमनेरमध्ये झाली शासकीय विश्रामगृहावर महिला आघाडीची बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2023Updated:09/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – आगामी काळ हा निवडणुकांचा राहणार असून नगरपरिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने व क्षमतेने लढवत गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसविण्याचे आवाहन शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संघटक शुभांगी पाटील यांनी केले आहे.

संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर तालुका महिला आघाडीच्या सक्षमीकरणाअंतर्गत नियोजनासाठी शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पाटील बोलत होत्या. महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्हा संपर्क संघटक शुभदा शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सपना मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक आशा केदारी, जिल्हा सरचिटणीस सुरेखा गुंजाळ, तालुका संघटक शितल हासे, शहर संघटक संगीता गायकवाड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

पाटील म्हणाल्या, सत्तेच्या लोभाने अनेकांनी शिवसेना सोडली. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रूपाने या सर्व गद्दारांना घरी बसविण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी होऊ घातलेल्या आगामी सर्वच निवडणुका शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी लढवाव्यात. गद्दारांची गद्दारी समाजात जाऊन सांगतानाच मतदानाच्या रूपाने या गद्दारांना गाडण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

शुभदा शिंदे म्हणाल्या, आगामी काळात महिलांनी सक्षम होण्याची आवश्यकता आहे. महिलांना न्याय आणि सुरक्षा केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच मिळू शकते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढाव्या व जिंकाव्यात. या माध्यमातून आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे.

सपना मोरे म्हणाल्या, मी दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आले. हे सर्व जनतेच्या आशीर्वादाने साध्य झाले आहे. तुम्ही एकाच पक्षात प्रामाणिक राहिला तर जनता, मतदार देखील तुमच्या पाठीशी उभे राहतात. पद आज आहे उद्या नाही किंवा आज छोटे पद असेल तर भविष्यात मोठे पद मिळेल, परंतु आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहूनच तुम्हाला मानसन्मान मिळतो.

यावेळी महिला आघाडीच्या विसपुते आणि परदेशी यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले.

संगमनेरमध्ये झालेल्या या बैठकीचे सूत्रसंचालन व नियोजन शिवसेना संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले. याशिवाय शिवसेनेचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे आणि संजय फड, अकोले तालुकाप्रमुख मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख महेश नवले हे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 791
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.