Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ न्यायालयाने खटला चालविण्याच्या आदेश! नेमके प्रकरण…
न्यायालय

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ न्यायालयाने खटला चालविण्याच्या आदेश! नेमके प्रकरण…

मंत्रिमंडळ विस्तारावेळी कृषिमंत्री पद जाण्याची चिन्ह!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

आपल्या वक्तव्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या आणि मंत्रिपदावर गंडांतराची शक्यता निर्माण झालेल्या राज्याच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात न्यायालयाने खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढल्या आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी आणि अपुरी माहिती दिल्याच्या कारणावरून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडच्या प्रथम वर्ग न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी 2021 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत हे आदेश देण्यात आले आहे.

या संदर्भात न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम. धनराज यांनी सीआरपीसी 204 अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 ‘अ’ नुसार प्रथम वर्ग न्यायालयात खटला चालविला जाणार आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये सत्तार यांच्यासह त्यांचे नोटरी एस. के. ढाकरे यांनाही आरोपी करण्यात आले होते, मात्र न्यायालयाने ढाकरे यांच्या विरोधातील दावा फेटाळला आहे. या याचिकेमध्ये मनोज गंगाराम मोरेलू व अजबराव पाटीलबा मानकर साक्षीदार आहेत. डॉ. हरिदास या प्रकरणी स्वतः युक्तिवाद करीत आहे.

या संदर्भात मंत्री सत्तार यांनी 10 जुलै 2023 रोजी आपले म्हणणे सादर करण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र न्यायालयाने तो नामंजूर केला व सत्तार यांच्या विरोधात प्रोसेस जारी केले आहे.

काय आहे प्रकरण…

न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार अब्दुल सत्तार यांनी 2014 व 2019 च्या सिल्लोड व सोयगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या शेतजमीन, व्यापारी संकुल, निवासी इमारत याविषयी तसेच स्वतःच्या शिक्षणासंदर्भात खोटी व अपुरी माहिती देत आवश्यक ती माहिती लपविली आहे.

त्यावर खोटे प्रतिज्ञापत्र तयार करणे, 26 क्रमांकाचा अर्ज सादर करताना त्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे माहिती न भरता रकाने रिकामे सोडणे. या गुन्ह्याबाबत याचिकाकर्त्याचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 अ नुसार कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 596
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.