Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वजनदार खाती बहाल… अब्दुल सत्तार, संजय राठोड व अतुल सावे यांच्याकडील खात्यांवर गंडांतर!
राजकारण

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वजनदार खाती बहाल… अब्दुल सत्तार, संजय राठोड व अतुल सावे यांच्याकडील खात्यांवर गंडांतर!

विखे पाटलांकडे महसूल खाते कायम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2023Updated:14/07/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

मुंबई – शपथविधीच्या तब्बल बारा दिवसानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अखेर राज्याच्या अर्थ खात्याच्या किल्ल्या सोपविण्यात आल्या आहे. शिवाय त्यांच्या सर्वच मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली आहे.

अजित पवार 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर खाते वाटपाचा घोळ सुरूच होता. त्यातच मुख्यमंत्री शिंदे गटाकडून पवारांना अर्थ खाते देण्यास विरोध दर्शविला जात होता. परिणामी पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खाते सोपविले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेरीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्ली दरबारात झालेल्या बैठकीनंतर खाते वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

शिंदे गटातील मंत्र्यांच्या विरोधानंतर देखील अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं तर दिलीप वळसे पाटील यांना दुसरे महत्त्वाचे असलेले सहकार खाते देण्यात आले आहे. याचबरोबर गेल्या काही दिवसात वादात सापडलेले राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषिमंत्री पद काढून ते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आदिती तटकरे यांना अपेक्षेप्रमाणे महिला आणि बालकल्याण खाते सोपविण्यात आले.

खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. या संघर्षामुळे खाते वाटपाला देखील विलंब लागला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे सोपविली जाण्याची चर्चा होती. मात्र अजित पवार अर्थ खात्यावर ठाम असल्याने विखे यांच्याकडे महसूल खाते कायम राहिले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात विखे देखील वजनदार मंत्री ठरले आहेत.

नव्या मंत्र्यांची खाती पुढील प्रमाणे :-

अजित पवार – अर्थ व नियोजन

दिलीप वळसे पाटील – सहकार

धनंजय मुंडे – कृषी

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा

आदिती तटकरे – महिला व बालकल्याण

संजय बनसोडे – क्रीडा

अनिल पाटील – मदत व पुनर्वसन

धर्मराव बाबा अत्राम – अन्न व औषध प्रशासन

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

याशिवाय अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांच्याकडे अल्पसंख्यांक विकास खाते ठेवण्यात आले आहे.

संजय राठोड यांच्याकडून अन्न आणि औषध प्रशासन खाते काढून त्यांच्याकडे मृदा जलसंधारण खाते ठेवण्यात आले आहे.

अतुल सावे यांच्याकडील सहकार खाते काढून त्यांच्याकडे ओबीसी कल्याण खात्याचा पदभार ठेवण्यात आला आहे.

असे आहे नवे मंत्रिमंडळ…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती अशी

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील  – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ  – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील  – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे – कृषि

सुरेशभाऊ दगडू खाडे – कामगार

संदीपान आसाराम भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत – उद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर -शालेय शिक्षण व मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क

अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 707
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.