Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा; तातडीने शिक्षक भरती न केल्यास राज्यभरात उद्रेक; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
शिक्षण

सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा; तातडीने शिक्षक भरती न केल्यास राज्यभरात उद्रेक; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून सरकारने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे.

या पत्रात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मध्यंतरी शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा चांगला निर्णय घेतला. परंतु या शाळांना अद्याप अनुदान मिळाले नसून सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान देणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असून त्यामध्ये प्रामुख्याने पेन्शन योजना,शाळांना वेतनेतर अनुदान दिले जात नाही. शिक्षकेतर कर्मचारी भरती सुद्धा अनेक वर्षापासून बंद आहे.

शाळेमध्ये विषयानुसार कला व क्रीडा शिक्षक नाही. शिक्षण विभागाचे अनेक इतर प्रश्नही प्रलंबित आहेत. त्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही. त्यातच शासनाने 7 जुलै रोजी परिपत्रक काढून राज्यातील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे.

राज्यात शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. वर्गात शिकवण्यासाठी शिक्षक नाही. त्यामुळे शाळा चालवणे अवघड झाले असून अनेक युवक शैक्षणिक पात्रता असूनही या जागांपासून वंचित आहेत. या सर्व गोंधळाचा परिणाम संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होत असून याचा गुणवत्तेवरही अतिशय गंभीर परिणाम होत आहे.

कंत्राटी अथवा सेवानिवृत्तांना मानधनावर नेमण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर पदवीधर व पात्र तरुणांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊन राज्यभरात मोठे आंदोलन होईल. यास शासन जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने तातडीने हे परिपत्रक रद्द करून एक महिन्याच्या आतमध्ये शंभर टक्के शिक्षक भरती करावी, अशी मागणी आमदार डॉ. तांबे यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 427
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.