Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे प्रकल्पाची सरकारला साडेसाती; उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस… जलसंपदाचे आर्थिक अधिकारही गोठविले!
न्यायालय

निळवंडे प्रकल्पाची सरकारला साडेसाती; उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस… जलसंपदाचे आर्थिक अधिकारही गोठविले!

सरकारच्या अडचणीत वाढ
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 20, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

औरंगाबाद – 54 वर्षानंतरही निळवंडे धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने सरकारला अवमान नोटीस बजावली आहे. याशिवाय या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकारही गोठविले आहेत.

वर्षानुवर्षाला काढलेल्या या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश घुगे व न्यायाधीश खोब्रागडे यांनी हे आदेश दिले. नोटीसला उत्तर देण्यासाठी 28 जुलै ही अंतिम तारीख असून त्यानंतर 3 ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार असल्याची माहिती कालवा कृती समितीचे वकील अँड. अजित काळे यांनी दिली

उत्तर नगर जिल्ह्यातील आवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व कालवे पूर्ण करण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते विक्रांत काळे व नानासाहेब जवरे यांनी समितीच्या माध्यमातून वारंवार आंदोलने केली. मात्र जलसंपदा विभागाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे सप्टेंबर 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी ऑक्टोंबर 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन जलसंपदा विभागाने दिले होते.

त्यानंतर मुदतवाढ घेत जलसंपदा विभागाने डावा कालवा मार्च 2023 तर उजवा कालवा जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न पत्र उच्च न्यायालयाला दिले होते. मात्र त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे जलसंपदाने काम पूर्ण केले नाही. त्यानंतरही ११ जुलै २०२२ ते ०५ जून २०२३ दरम्यान वारंवार मुदतवाढी घेऊनही त्या पाळल्या नाही. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यानी ॲड. अजित काळे यांच्यामार्फत न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान त्याबाबत कालवा कृती समितीने १८ जानेवारी २०२३ रोजी उच्च न्यायालयाच्या हि बाब लक्षात आणून दिली होती. त्या वेळी उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी सरकारला वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सक्त ताकीद दिली होती. काम वेळेत पूर्ण न केल्यास आर्थिक अधिकार गोठविण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले.

उत्तर नगर जिल्ह्यातील या प्रकल्पास तीन पिढ्यांपासून विरोध करणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने व त्याच्या दक्षिणेतील सुपुत्राने कोणालाही विश्वासात न घेता व निमंत्रण न देता डावा कालवा पूर्ण करण्याचा आव आणून राज्यातील मान्यवर नेत्याना निमंत्रण देऊन त्याचे जलपूजन ३१ मे २०२३ रोजी अकोले येथील धरणावर केले.

जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ व जबाबदार अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. परिणामस्वरूप हा प्रकल्प आज प्रकल्प ७.९३ कोटीवरून यावर्षीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ५ हजार १७७.३८ कोटींवर गेला आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने आता उजवा कालवा पूर्ण करण्यासाठी आता डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे याकडे कालवा कृती समितीचे वकील अँड. अजित काळे यांनी नुकत्याच झालेल्या सुनावणीत लक्ष वेधून चांगलाच समाचार घेत सरकारच्या या बेजबाबदार वृत्तीवर बोट ठेवले होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,229
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात…

संगमनेर नगरपरिषदेचा दणका: भाजप नेत्याच्या मुलाविरुद्ध अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.