Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन मंत्र्यांच्या शेतात तो पाहुणचारासाठी मुक्कामाला थांबला आणि पिंजऱ्यात अडकला…
महाराष्ट्र संवाद विशेष

राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन मंत्र्यांच्या शेतात तो पाहुणचारासाठी मुक्कामाला थांबला आणि पिंजऱ्यात अडकला…

महसूल मंत्र्यांच्या शेतात पकडला चौथा बिबट्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

लोणी – राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लोणी बुद्रुक मधील पाथरे रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पाच-सहा वर्षे वयाचा नर बिबट्या शुक्रवारी रात्री जेरबंद झाला. विखे पाटील यांच्या शेतात जेरबंद झालेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले.

लोणी परिसरामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. या परिसरात आतापर्यंत जवळपास 15 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथरे रस्त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शेती आहे.

मोठ्या लोकवस्तीच्या परिसरात असलेल्या या शेतामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असल्याचे दिसून आल्याने या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने मंत्री विखे यांच्या शेतात पिंजरा लावलेला होता.

शुक्रवारी मध्यरात्री या शेतात भक्ष्याच्या शोधात पाहुणचारासाठी थांबलेला बिबट्या अलगदपणे या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याने दिलेल्या जोराच्या डरकाळ्यामुळे आजूबाजूच्या लोकांना जाग आली.

मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने कोणीही शेताकडे जाण्याचे धाडस केले नाही. सकाळपर्यंत बिबट्याच्या डरकाळ्या सुरू असल्याने सकाळी नागरिकांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली असता त्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर पिंजऱ्यात अडकलेला हा भला मोठा बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळतात मंत्री विखे पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर तेही घटनास्थळी पोहोचले होते.

आत्तापर्यंत लोणी परिसरात वन खात्याने पकडलेल्या बिबट्यांमध्ये हा बिबट्या सर्वाधिक वयाचा म्हणजेच पाच-सहा वर्षाचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वनविभागाने पकडलेल्या बिबट्याला तेथून हलविले असले तरी या परिसरात आणखी दोन बिबट्यांनी नागरिकांना दर्शन दिल्याने भीतीचे वातावरण अद्यापही कायम आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,030
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शिक्षणातील लोकसहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत…

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.