Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय, त्यामुळेच सरकार निवडणुकांना घाबरतय! संगमनेरात युवा सेनेचा संपर्क अभियान मेळावा… यांनी केले मार्गदर्शन
राजकारण

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय, त्यामुळेच सरकार निवडणुकांना घाबरतय! संगमनेरात युवा सेनेचा संपर्क अभियान मेळावा… यांनी केले मार्गदर्शन

निवडणुकांची तयारी सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडून गद्दार मिंधे गटात सामील झाले असले, तरी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे समोर दिसत असल्याने राज्यातील भाजपचे सरकार कोणत्याही निवडणुका घेत नाही. उलट निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे, असे असले तरी आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युवा सेनेने देखील काम सुरू केल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर संगमनेरात तोफ डागली. उद्धव ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

संगमनेरमध्ये शिवसेना प्रणित युवा सेनेचा युवा संपर्क अभियान मिळावा पार पडला. युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विराज कावाडिया, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे, शिर्डी लोकसभा विस्तारक नितेश साटम आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांनी या मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांसह परिसरातील युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अंकित प्रभू म्हणाले, शिवसेना सोडून 40 गद्दार आणि त्यांच्यासह इतर काही लोक बाहेर पडले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता समाजात वाढत आहे त्यामुळे निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ करत आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

बबन घोलप म्हणाले, शिवसेनेमध्ये यापुढील काळात जो पदाधिकारी कार्यकर्ता, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणार नाही, त्याला बाजूला करत प्रामाणिक शिवसैनिकांना संधी दिली जाणार आहे. आगामी सर्व निवडणुका या केवळ लढवायच्या नसून त्या जिंकण्याच्या उद्देशाने लढवायच्या असल्याने त्यासाठी सर्वांनी तयारी करण्याचे आवाहन केले.

अमर कतारी म्हणाले, येथील शिवसेना व युवासेना एकत्रितपणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी विराज कावाडिया, अजय व्हनोळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश हासे, अकोले तालुकाप्रमुख मनोज मोरे, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे व संजय फड आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन युवा सेना शहरप्रमुख गोविंद नागरे यांनी केले. युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी स्वागत केले. शिवसेना तालुका संघटक राजू सातपुते यांनी आभार मानले.

यावेळी संगमनेर, अकोले, शिर्डी येथील युवा सेना, शिवसेना, महिला आघाडीच्या कोपरगाव शहर प्रमुख विसपुते, संगमनेरच्या आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक पैसल सय्यद, उपजिल्हा समन्वयक पप्पू कानकाटे, उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, तालुका समन्वयक अक्षय बिल्लाडे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, पठार भाग प्रमुख योगेश खेमनर, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, उप तालुकाप्रमुख सागर भागवत, जना नागरे, सचिन साळवे, फरोज कतारी, शिवसेनेचे उपशहर प्रमुख मुस्लिम मावळा अजीज मोमीन, इम्तियाज शेख, दीपक वन्नम, सुदर्शन इटप, वेणुगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 482
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील.…

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.