Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संभाजी भिडेच्या प्रतिमेला संगमनेरात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन
आंदोलन

संभाजी भिडेच्या प्रतिमेला संगमनेरात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

भिडेंविरोधातील घोषणांनी परिसर दुमदुमला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने भिडे गुरुजीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

संगमनेर बस स्थानक येथे संभाजी भिडे विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, दिलीप जोशी, गजेंद्र अभंग, सुरेश थोरात, जावेद शेख, पद्मा थोरात, अर्चना बालोडे, सुनंदा जोर्वेकर, संतोष हासे, संपत डोंगरे, गणेश मादास, दत्तू कोकने, सुरेश झावरे, नवनाथ आंधळे, अनिकेत घुले आदींसह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणा देत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

बाबा ओहोळ म्हणाले: राष्ट्र पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी संभाजी भिडे हे काही बेताल वक्तव्य करत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाबा, महात्मा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. या माणसाला तातडीने अटक करून कडक शिक्षा करावी.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या: एका बाजूला मनिपुर जळते आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातही शांतता भंग करण्यासाठी भिडेसारख्या व्यक्ती बेताल वक्तव्य करत आहेत. महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी काही विचारसरणीचे लोक द्वेषभावना निर्माण करत आहेत. अशांना जरब बसवण्यासाठी तातडीने अटक करावी.

मिलिंद कानवडे म्हणाले: भाजपा व आरएसएस विचारसरणीच्या लोकांना राष्ट्रपुरुषांबद्दल आदर आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी भिडेंना पाठीशी न घालता तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे.

सुरेश थोरात म्हणाले: संभाजी भिडे यांनी साईबाबा विरुद्ध बेताल वक्तव्य केले आहे. विद्यमान पालकमंत्री शिर्डी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून पालकमंत्री व खासदारांनी तातडीने भिडे विरुद्ध निषेध करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करायला हवी होती मात्र साईबाबांविरुद्ध बेताल वक्तव्य होत असताना त्यांनी गप्प राहणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले.

यावेळी सोमेश्वर दिवटे, अनिकेत घुले आदींनी निषेध व्यक्त केला. याप्रसंगी के. के. थोरात, संजय कोल्हे, उबेद शेख, विष्णुपंत रहाटळ, विजय उदावंत, विजय राहणे, भास्कर शरमाळे, गणपतराव सांगळे, अंबादास आडेप, आनंद वर्पे, जयराम ढेरगे, भाऊसाहेब शिंदे, मिनानाथ वर्पे, माणिक यादव, शिवाजी जगताप, गौरव डोंगरे, आदिसह विविध संघटनांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख – डॉ. तांबे

राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख झाली आहे. लोकशाहीला ताकद देणाऱ्या पुरोगामी विचारांचे असणाऱ्या गांधीजींनी सातत्याने देशाच्या एकात्मतेसाठी काम केले असून पुढील पिढ्यांना विचार दिला आहे. त्यांच्याच विचारावर देशाची वाटचाल सुरू असून काही विकृत प्रवृत्तीकडून होणाऱ्या या अवमानकारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 748
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.