महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे – लोकमान्य टिळक हे भारतीयांच्या कपाळावरील टिळा आहेत असे गौरवोद्गार काढत आजचा पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्प देणार आहे. पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी पुण्यात: लोकमान्य टिळक यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान आज पुण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विधिवत पूजा करत दर्शन घेतले त्यानंतर पुरस्कार सोहळ्यासाठी एस पी महाविद्यालयात हजेरी लावली.
यांची उपस्थिती: यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पुरस्कार समितीचे प्रमुख दीपक टिळक, रोहित टिळक उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, रोख रक्कम अशा पुरस्काराने लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मला मिळालेल्या पुरस्काराशी टिळकांचे नाव जोडले. त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी काही पटीने वाढली. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांना समर्पित करत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत येण्याची संधी मिळाली. हे भाग्य समजतो, अशी मराठीतून सुरुवात करत पुणेकरांची वाहवा मिळवली.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टिळकांचे योगदान मोठे होते. श्रद्धा संस्कृती या सर्व मागासलेपणाचे प्रतीक आहे, अस ब्रिटिशांचा मत होत. टिळकांनी ब्रिटिशांचं हे मत चुकीचं ठरवलं. टिळकांचे आणि गुजरातचे विशेष नातं आहे असे देखील मोदींनी आवर्जून सांगितले.

